विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या उमेदवारांची मते कापणार आणि त्याचा फायदा भाजप शिवसेनेच्या उमेदवारांना होणार, असा कयास राजकीय तज्ञ बांधत असताना किंबहुना महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर तसाच आरोप करत असताना प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकरांनीच महाविकास आघाडीवर वेगळाच प्रहार केला आहे. Maha Vikas Aghadi And Bjp Fixing In Lok Sabha Election, Says Prakash Ambedkar
वंचित बहुजन आघाडीचे भाजपबरोबर कुठलेच साटेलोटे नाही, उलट महाविकास आघाडीनेच भाजपशी लोकसभेच्या 20 जागांवर फिक्सिंग केल्याचा सनसनाटी आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाण्यासह 20 जागांवर महाविकास आघाडीचे भाजप शिवसेनेची फिक्सिंग झाले असल्याचा आरोप आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी त्यांनी कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनाही फटकारले. शाहू महाराज कोण आहेत, त्यांचे कुटुंब कोण आहे, त्यांच्या जवळच्या कुटुंबातील माणसं कोण आहे, हे जगाने मान्य केले आहे. त्यामुळे त्यावर दोन गाढवांनी कमेंट केल्यावर आपण त्यावर कमेंट करावी, असे मला वाटत नाही, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी चढवला.
ओबीसी आणि जरांगे फॅक्टर
निवडणूक निकाल काय लागेल??, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आताच लावता येणार नाही. कारण या निवडणुकीवर मनोज जरांगे आणि ओबीसी हे दोन फॅक्टर मोठा परिणाम करणार आहेत, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. लोकसभेच्या सध्याच्या लढतीत महायुती किंवा महाविकास आघाडी यांनी जरांगे फॅक्टर लक्षात घेतलेला नाही. पण गरीब मराठा हा त्यांना आपला मेंटॉर मानतोय. 30 % मराठा मतदार जरांगे यांच्या मताप्रमाणे मतदान करणार आहे. मनोज जरांगे यांनी दोन्ही आघाड्यांना मतदान करू नका असं म्हटलंय, याकडे प्रकाश आंबेडकरांनी आवर्जून लक्ष वेधले. मध्यंतरी जी आंदोलने झाली, त्यामुळे ओबीसी राजकीयदृष्टीने जागृत झाला आहे. म्हणून त्याने बलाढ्य मराठा समाजाला आमच्यातून आरक्षण देणार नसल्याचे ठणकावून सांगितल्याची आठवणही प्रकाश आंबेडकरांनी करवून दिली.
वंचितच्या नादी लागू नका
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली होती. निवडणुकीत जागांचा समझोता होतो. महाविकास आघाडीत जागा वाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चा करू नये. आम्ही जर सर्व बाहेर काढले तर काही लोकांना पब्लिकली बाहेर फिरणे कठिण होईल. वंचितच्या नादी लागू नका. कपडे फाडण्यात आम्ही एक्स्पर्ट आहोत, असा इशाराच आंबेडकरांनी दिला होता.
Maha Vikas Aghadi And Bjp Fixing In Lok Sabha Election, Says Prakash Ambedkar
महत्वाच्या बातम्या
- संदेशखळी हिंसाचाराच्या तपासासाठी CBIने जारी केला ईमेल
- 2014 मध्येही शरद पवारांनी दाखविली होती धरसोड वृत्ती; प्रफुल्ल पटेलांपाठोपाठ छगन भुजबळांचाही गौप्यस्फोट!!
- उष्णतेच्या लाटेचा परिणामकारक मुकाबला; पंतप्रधान मोदींनी घेतला सर्व तयारीचा आढावा!!
- BRS नेत्या के. कविता यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयने EDच्या ताब्यातून केली अटक!