वृत्तसंस्था
हैद्राबाद : तेलंगणा मध्ये लक्ष्मी नरसिंह स्वामी यांचे भव्य दिव्य मंदिर साकारले आहे. विशेष म्हणजे आजच्या युगात पुरातन मंदिराच्या शैलीचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हे मंदिर साकारले आहे.
मंदिर १२०० कोटींत बांधले आहे. या यदाद्री मंदिरचे उद्घाटन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या हस्ते सोमवारी झाले.Magnificent Yadadri temple built in Telangana, topped with gold worth Rs 125 crore: Rs 1,200 crore spent
ग्रेनाईटचे मोठं मोठे ब्लॉक जोडण्यासाठी चुन्याचा वापर केला आहे. एक हजार वर्षे मंदिराचे काहीही बिघडणार नाही. तसेच १२५ किलो सोने फक्त शिखरासाठी वापरले आहे.कृष्णशिला (ब्लॅक ग्रॅनाइट स्टोन) पासून गेल्या १०० वर्षांत बांधलेले हे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे.
मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे धर्मग्रंथानुसार बांधले आहे.त्याचे सौंदर्य इतके आहे की उत्तमोत्तम राजवाडे देखील फिके पडतात. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा अंदाजे खर्च ११०० कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे, तर तेलंगणा सरकार यदाद्री मंदिर प्रकल्पावर १२०० कोटी रुपये खर्च करत आहे. १००० कोटी रुपये आधीच खर्च झाले आहेत.
मंदिरात १४० किलो सोने वापरले आहे. यापैकी १२५ किलो सोने गर्भगृहाच्या शिखरावर (विमान गोपुरम) बसविण्यात येत आहे. येथे जे काळे ग्रॅनाइटचे दगडही बसवण्यात आले आहेत, जे१ हजार वर्षांपर्यंत खराब होणार नाहीत.
Magnificent Yadadri temple built in Telangana, topped with gold worth Rs 125 crore: Rs 1,200 crore spent
महत्त्वाच्या बातम्या
- हाडे गोठविणाऱ्या थंडीत झोजिला बोगद्याचे काम आहे सुरू, लेह-लडाख भारताशी कायमस्वरुपी जोडले जाणार
- श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, भारत करणार मदत
- व्हाट्सअॅप आणतंय भन्नाट फीचर, आता 2GB पर्यंतचा चित्रपटही करू शकाल शेअर, टेलिग्रामला देणार टक्कर, वाचा सविस्तर…
- नरेंद्र मोदींना पराभूत करणे अशक्य का नाही, प्रशांत किशोर यांनी सांगितले कारण, राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन म्हणाले- मोदींसारखे गुण विरोधी नेत्यांमध्ये नाहीत