• Download App
    चक्क विमान भाड्याने घेत मदुराईतील कुटुंबाने लावले पोराचे लगीन, सोहळ्याची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल।Madurai family arrange marriage in plane

    चक्क विमान भाड्याने घेत मदुराईतील कुटुंबाने लावले पोराचे लगीन, सोहळ्याची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल

    विशेष प्रतिनिधी

    मदुराई : विवाहानंतर आनंद लुटण्याच्या उद्देशाने बंगळूरला जाण्यासाठी विमान भाड्याने घेत असल्याचे कारण दाखवून चक्क विमानातच लग्न लावण्याचा प्रताप मदुराईतील एका कुटंबाने  केला आहे. विमानात कोणत्याच प्रकारचे कोरोना नियम न पाळल्याने खळबळ उडाली आहे. Madurai family arrange marriage in plane

    विमान कंपनी स्पाईसजेटने या घटनेची गंभीर देखल घेतली असून विमानातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. स्पाईसजेट कंपनीकडून नागरी वाहतूक महासंचालनालयाने अहवाल मागविला आहे, बोइंग ७३७ विमानात जल्लोषाचे वातावरण होते.



    वधुने गजरा आणि दागिने घातले होते, तर वराने दक्षिण भारतीय पद्धतीचा पारंपरिक पोशाख घातला होता. सोहळ्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका क्षणी छायाचित्रकार सर्वांना हसण्यास सांगत असल्याचेही दिसून येते. विमानच बसलेली पाहुणे मंडळी लग्नाचा आनंद लुटत असल्याचे दिसते.

    मुख्य म्हणजे कुणीही मास्क घातल्याचे दिसून येत नाही. स्पाईसजेटतर्फे सांगण्यात आले की, ग्राहक तसेच एजंटला कोविड नियमावलीचे पालन करण्यास सांगण्यात आले होते. विमानात कोणताही कार्यक्रम करू नये असेही बजावण्यात आले होते. तशी माहिती लेखी आणि तोंडी कळविण्यात आली होती.

    Madurai family arrange marriage in plane

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट