Madras High Court slams EC : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले आहे. निवडणुकीच्या सभांमध्ये राजकीय पक्षांच्या वतीने कोरोना प्रोटोकॉलला तिलांजली देण्यात आल्याबद्दल मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाची कानउघाडणी केली. Madras High Court slams EC over corona eruption
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले आहे. निवडणुकीच्या सभांमध्ये राजकीय पक्षांच्या वतीने कोरोना प्रोटोकॉलला तिलांजली देण्यात आल्याबद्दल मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाची कानउघाडणी केली.
सद्य:परिस्थितीला केवळ आणि केवळ निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश कडक शब्दांत म्हणाले. मतदानाच्या दिवशी म्हणजेच 2 मे रोजी कोविड प्रोटोकॉलची खबरदारी घ्यावी, असेही मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत. असे केले नाही तर मतमोजणीवर त्वरित बंदी घातली जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या संकटाबाबत मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हायकोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. निवडणूक सभा सुरू होत्या तेव्हा आयोग काय दुसऱ्या ग्रहावर होतं का?, असा सवालही हायकोर्टाने विचारला आहे. यावर उत्तर देताना आयोगाने कोविड नियमांचं पालन केल्याचं सांगितलं. तसेच मतदानाच्या दिवशी पूर्ण नियम पाळण्यात आल्याचंही स्पष्टीकरण दिलं. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.
हायकोर्टने 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीसंदर्भातही गंभीर इशारा दिला आहे. मतमोजणीच्या दिवशी तरी किमान कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा, अन्यथा आम्ही मतमोजणी स्थगिती आणू, असा इशाराही हायकोर्टाने दिला आहे.
Madras High Court slams EC over corona eruption
महत्त्वाच्या बातम्या
- ‘केरळ सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर आहे’, राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे मत
- रेमडेसिव्हिरच्या जप्त केलेल्या 5000 कुप्या वापरण्यासाठी महाराष्ट्राला कोर्टाच्या परवानगीची प्रतीक्षा
- Mission Vayu : भारताला तातडीने १० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवण्यासाठी अमेझॉनचा पुढाकार
- कौतुकास्पद : भाजप आमदार गायकवाडांनी ऑक्सिजन प्लांटसाठी दिला १ कोटीचा निधी; मुलाचे लग्न साधेपणाने करून त्या खर्चात लसीकरण
- राज्यांच्या लसींबद्दलच्या प्रत्येक प्रश्नाला केंद्रीय आरोगमंत्र्यांकडून उत्तर, वाचा… डॉ. हर्षवर्धन यांच्या खुल्या पत्रातील टॉप १० मुद्दे