• Download App
    ''पुरुषांसाठी घरगुती हिंसाचारासारखा कायदा नाही, हे दुर्दैव”: मद्रास हायकोर्ट Madras high court says there is no law like domestic violence act for husband to proceed against wife

    ”पुरुषांसाठी घरगुती हिंसाचारासारखा कायदा नाही, हे दुर्दैव”; मद्रास हायकोर्ट

    वृत्तसंस्था

    चेन्नई : पुरुषांना तक्रार करण्यासाठी घरगुती हिंसाचाराच्या कायद्यासारखा दुसरा कायदा नाही, हे दुर्दैव असल्याचे मत मद्रास न्यायालयाने व्यक्त केले आहे. Madras high court says there is no law like domestic violence act for husband to proceed against wife

    एका महिलेने पतीला त्रास देण्यासाठी घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने पुरुषांसंदर्भात भाष्य केले आहे. न्यायाधीश एस. वैद्यनाथन यांनी सुनावणीवेळी काही निरीक्षणे नोंदवली. महिलांविरुद्धच्या प्रकरणामंध्ये पुरुषांना तक्रार करण्यासाठी घरगुती हिंसाचार कायद्यासारखा दुसरा कायदा नाही, असे मत व्यक्त केले.



    याचिकाकर्त्यास अकारण त्रास दिला

    याचिकाकर्त्याची पत्नी त्याला अनावश्यक त्रास देत आहे. पतीकडून घरगुती हिंसाचार कायद्यासारखी पत्नीविरूद्ध कारवाई करण्याची मागणी नाही. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी चार दिवस आधीच तक्रार दिली आहे. यावरुन स्पष्ट होते की, पत्नीने घटस्फोटाची अपेक्षा केलीअसून याचिकाकर्त्यास अनावश्यक त्रास दिला आहे, असे या प्रकरणात दिसून येते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

    लग्न हा करार नसून एक संस्कार

    नव्या पिढीने लक्षात ठेवावे, लग्न हा करार नसून एक संस्कार आहे. घरगुती हिंसाचार अधिनियम  २००५ लागू झाल्यानंतर ‘संस्कार’ या शब्दाला अर्थ उरला नाही. अहंकार आणि असहिष्णुता या गोष्टी घरात येताना बाहेर ठेवल्या पाहिजे. अन्यथा मुलांना दयनीय आयुष्याला सामोरे जावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

    अखेर याचिकाकर्त्याला कामावर घेण्याचे आदेश

    दरम्यान, पत्नीने पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली.त्यानंतर त्याला कामावरुन काढून टाकले होते. न्यायाधीश वैद्यनाथन यांनी १५ दिवसांत याचिकाकर्त्याला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने नमूद केले की, याचिकाकर्त्याने पत्नीच्या छळाला कंटाळून घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. कौटुंबिक न्यायालयाने ती मान्य केली होती. निकाल येण्यापूर्वीच पत्नीने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.

    Madras high court says there is no law like domestic violence act for husband to proceed against wife

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो