• Download App
    विद्यार्थ्याच्या बॅग, पाठ्यपुस्तकांवर मुख्यमंत्री किंवा राजकारण्यांचे फोटो छापणे घृणास्पद, मद्रास उच्च न्यायालयाचे हे प्रकार थांबविण्याचे आदेश|Madras High Court orders ban on printing photos of CM or politicians on student bags, textbooks

    विद्यार्थ्याच्या बॅग, पाठ्यपुस्तकांवर मुख्यमंत्री किंवा राजकारण्यांचे फोटो छापणे घृणास्पद, मद्रास उच्च न्यायालयाचे हे प्रकार थांबविण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : विद्यार्थ्यांच्या बॅग, पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्यावर मुख्यमंत्री किंवा इतर राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोटो छापणे घृणास्पद आहे. हे प्रकार त्वरित थांबविण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, ज्या शैक्षणिक साहित्यावर अगोदरच फोटो छापले आहेत त्यांचा वापर करावा.Madras High Court orders ban on printing photos of CM or politicians on student bags, textbooks

    कारण त्यासाठी मोठ्या प्रमाणातवर सार्वजनिक निधी खर्च झाला असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.तामिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश यांनी राज्य विधानसभेत सांगितले की, सरकार 65 लाख स्कूलबॅग आणि १० लाख स्टेशनरी वस्तूंवर माजी मुख्यमंत्री के पलानीस्वामी आणि जे जयललिता यांचे फोटो आहेत.



    या वस्तूंचे वितरण सुरू ठेऊन मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सरकारी तिजोरीतील १३ कोटी रुपये वाचविले आहेत. यावर न्यायालयाने शैक्षणिक साहित्यावर माजी मुख्यमंत्री आणि इतरांचे फोटो काछापले आहेत, असा सवाल केला आहे.

    मतदानाचा अधिकारही नसलेल्या मुलांच्या साहित्यावर राजकीय पदाधिकाऱ्यांचा मग तो मुख्यमंत्र्यांचाही फोटो छापणे घृणास्पद आहे. सार्वजनिक निधीचा राजकारण्यांच्या वैयक्तिक स्वाथार्साठी गैरवापर केला जाऊ शकत नाही.

    त्याचबरोबर माजी मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले शैक्षणिक साहित्य सरकारने वाया घालवू नये. त्यासाठी सार्वजनिक निधी खर्च झालेला आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.अ‍ॅडव्होकेट जनरल आर शुन्मुगासुंदरम यांनी न्यायालयाला सांगितले की विद्यमान मुख्यमंत्री एमके स्टालिनत्यांची छायाचित्रे प्रकाशित केली जाणार नाहीत.

    Madras High Court orders ban on printing photos of CM or politicians on student bags, textbooks

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित