विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेश राजस्थान तेलंगण छत्तीसगड मिझोराम या 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या दिवशी आज 9 ऑक्टोबर 2023 रोजी काँग्रेसची धावपळ उडाली आणि पक्षाने तातडीने कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल हे प्रमुख नेते हजर होते.Madhya Pradesh-Rajasthan Elections Announced Congress Runs; Executive meeting at headquarters!!
मध्य प्रदेशात नियोजित वेळेनुसार निवडणुका होणार आहेत हे गृहीत धरून भाजपने तिथे 78 उमेदवार जाहीरही करून झाले. त्यामध्ये 3 केंद्रीय मंत्री 7 खासदारांना भाजपने प्रत्यक्ष निवडणुकीची तिकिटे देऊन मैदानात उतरविले.
पण काँग्रेस नेतेलमात्र त्यांच्या नेहमीच्या कार्यशैलीनुसार निवांत होते. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची तिकिटे ठरविण्यासाठी काँग्रेसने 7 ऑक्टोबरला पहिली बैठक घेतली. त्यामध्ये फक्त 130 जागांवरच्या उमेदवारांची चाचपणी केली. उरलेल्या 104 जागा विषयी चर्चा देखील झाली नाही आणि पुढची बैठक 7 – 8 दिवसांनी होईल, असे कमलनाथ यांनी जाहीर केले.
पण आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला जाग आली आणि पक्ष कार्यकारिणीची बैठक घेणे भाग पडल्याने आज तातडीची बैठक झाली. अर्थात त्या बैठकीत लगेच कोणता निर्णय झाला, असे घडले नाही. पण निदान बैठक तरी झाली असे म्हणायची वेळ आली.
कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम यापैकी कुठल्याही राज्यातले कोणतेही उमेदवार काँग्रेसने अद्याप जाहीरच केलेले नाहीत. उलट आत्तापर्यंत संथगतीने बैठक होत होत्या, प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होताना त्या बैठकांना काँग्रेसने किंचितसा वेग दिला आहे, एवढेच आजच्या कार्यकारणीच्या बैठकीतून स्पष्ट झाले.
Madhya Pradesh-Rajasthan Elections Announced Congress Runs; Executive meeting at headquarters!!
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाचे मूळ काय? कसे मजबूत झाले ज्यू? वाचा सविस्तर
- नैनितालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळी , १४ जण बेपत्ता
- अडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून??; कराडातच नाही, तर बारामतीत कुठून??
- ५०० वर्षांनंतर रामजन्मभूमी परत घेतली, तर ‘सिंध’ का नाही? मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान!