• Download App
    मध्य प्रदेश : दतियामध्ये मिनी ट्रक नदीत पडला, १२ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी Madhya Pradesh Mini truck falls into river in Datia 12 dead many seriously injured

    मध्य प्रदेश : दतियामध्ये मिनी ट्रक नदीत पडला, १२ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

    लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मिनी ट्रकने जात होते.

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : मध्य प्रदेशातील दतिया येथे बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली असून एक मिनी ट्रक बुहारा नदीत पडला. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला, तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Madhya Pradesh Mini truck falls into river in Datia 12 dead many seriously injured

    मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक ग्वाल्हेरच्या बिल्हेटी गावातून टीकमगडला मिनी ट्रकने जात होते. त्यानंतर बुहारा गावाजवळील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ ट्रक अनियंत्रित होऊन नदीत पडला.

    घटनेची माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे, त्या सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    Madhya Pradesh Mini truck falls into river in Datia 12 dead many seriously injured

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे जेट-इंधन मार्चमध्ये 6% महागले; रुपया घसरल्यामुळेही भारतीय विमान कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम

    Pushkar Singh Dhami : बंगालमध्ये मतदान करणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका; धामी म्हणाले- SIR मधून बनावट मतदार हटवल्याने दीदी घाबरल्या

    नितीश कुमार राज्यसभेत येऊन भाजपच्या मुख्य टीम मध्ये सामील, पण शरद पवार अजूनही “राखीव” खेळाडूच!!