लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मिनी ट्रकने जात होते.
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशातील दतिया येथे बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली असून एक मिनी ट्रक बुहारा नदीत पडला. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला, तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Madhya Pradesh Mini truck falls into river in Datia 12 dead many seriously injured
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक ग्वाल्हेरच्या बिल्हेटी गावातून टीकमगडला मिनी ट्रकने जात होते. त्यानंतर बुहारा गावाजवळील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ ट्रक अनियंत्रित होऊन नदीत पडला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे, त्या सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Madhya Pradesh Mini truck falls into river in Datia 12 dead many seriously injured
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल यांच्या सरकारी बंगल्याचे कॅग ऑडिट करणार; नूतनीकरणासाठी 53 कोटी रुपये खर्च, एलजींनी गृह मंत्रालयाला केली होती शिफारस
- आदिपुरुषवर अलाहाबाद हायकोर्ट म्हणाले- दरवेळी हिंदूंच्या सहिष्णुतेची परीक्षा कशाला? नशीब, त्यांनी कायदा मोडला नाही!
- पुतीनविरोधात बंड होणार हे अमेरिकेला माहिती होते, रिपोर्टमध्ये दावा- त्यांनी हे नाटोपासूनही लपवले
- काश्मीरमध्ये १५ दिवसांत ११ पाकिस्तानी दहशतवादी ठार; ५५ किलो ड्रग्ज अन् मोठ्याप्रमाणात शस्त्रंही जप्त!