बचावकार्य युद्धपातळीवर सुरू; मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतली या घटनेची दखल
विशेष प्रतिनिधी
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर मोठी दुर्घटना घडली. शहरातील स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने २५ हून अधिक भाविक त्यात पडले आहेत. या दुर्घटनेनंतर मंदिरात एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर बचावकार्य सुरू झाले. Madhya Pradesh Many feared being trapped after a stepwell at a temple collapsed in Patel Nagar area in Indore
VIDEO : अरे गधड्या तुझी लायकी आहे का सावरकरांबद्दल बोलायची? – राज ठाकरेंचा राहुल गांधींवर घणाघात!
घटनास्थळी उपस्थित नागरिक पायरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पटेल नगरच्या मंदिरात झालेल्या दुर्घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेची दखल घेतली आहे. इंदूरचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांशी फोनवर बोलून बचावकार्याला गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने बचाव कार्यात गुंतलो आहोत. १० जणांना बाहेर काढण्यात आले असून ९ जण आत सुरक्षित आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मला खात्री आहे की आम्ही सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढू शकू.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, धार्मिक कार्यक्रमादरम्यान मंदिरातील प्राचीन पायरीच्या छतावर भाविकांची मोठी गर्दी जमली होती आणि छत अधिक लोकांचा भार सहन करू शकले नाही आणि ते कोसळले.
Madhya Pradesh Many feared being trapped after a stepwell at a temple collapsed in Patel Nagar area in Indore
महत्वाच्या बातम्या
- Video : अमृतपाल सिंगने जारी केला व्हिडिओ , म्हणाला – ‘मला अटक करण्याचा हेतू असता तर…’
- राहुल गांधीचे लोकसभा सदस्यत्व रद्द प्रकरणावर नितीश कुमारांचे मौन; प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा, म्हणाले
- iCloud : मोदी पायउतार झाल्यावर भाजपचे भ्रष्ट नेते तुरुंगात, केजरीवालांची दिल्ली विधानसभेत आगपाखड; पण नेमके “रहस्य” काय??
- महाविकास आघाडीच्या 11 सभा विरुद्ध 288 सावरकर गौरव यात्रा; शहास महाकाटशह!!