• Download App
    मध्य प्रदेशात आज डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; दुपारी 3:30 वाजता शपथविधी सोहळा Madhya Pradesh Dr. Mohan Yadav's cabinet expansion; Swearing-in ceremony at 3:30 p.m

    मध्य प्रदेशात आज डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; दुपारी 3:30 वाजता शपथविधी सोहळा

    वृत्तसंस्था

    भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होणार आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याचे भाजपच्या सुत्रांकडून सांगितले गेले. Madhya Pradesh Dr. Mohan Yadav’s cabinet expansion; Swearing-in ceremony at 3:30 p.m

    मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दोन दिवस दिल्लीत राहून भाजपच्या सर्व नेत्यांची भेटगाठी घेतल्या. बड्या नेत्यांशी विचारमंथन केल्यानंतर उद्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. सीएम यादव आजच भोपाळला परतणार आहेत. सोमवारी सकाळी ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. राजभवनात शपथविधी होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. त्या दृष्टीने राजभवनात तयारी देखील सुरू झालेली आहे.


    MPचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची विधानसभेत ग्वाही, कोणतीही योजना बंद होणार नाही, सर्व योजनांसाठी पुरेशी रक्कम


    शपथविधीपूर्वी CM यादव इंदूरला जातील

    मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव सोमवारी इंदूरला जाणार आहेत. कनकेश्वरी धाम संकुलातील हुकुमचंद मिलच्या कामगारांच्या थकीत वेतनाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमात ऑनलाईन सामील होणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

    मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी रविवारी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांची भेट घेतली. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की, 12 जानेवारी हा युवा दिन आहे. यावेळी क्रीडा आणि युवकांशी संबंधित अनेक कार्यक्रमांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मध्य प्रदेश सरकारला पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही क्रीडामंत्र्यांनी दिली.

    Madhya Pradesh Dr. Mohan Yadav’s cabinet expansion; Swearing-in ceremony at 3:30 p.m

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- राहुल थकू नका, तुम्हाला तामिळनाडू-बंगालमध्येही हरायचे आहे, त्यांना विकासाचे राजकारण समजत नाही

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा