लिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एनएसएही लावण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या संतापजनक लघुशंका प्रकरणातील पीडित दशमत रावत यांचे आज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी पाय धुतले. यावेळी मुख्यमंत्री शिवराज यांनी दशमत रावत यांना श्री गणेशाची मूर्ती अर्पण केली आणि शाल पांघरून त्यांचा सन्मान केला. तसेच, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी दशमत यांना आपला मित्र म्हटले आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan meets Dashmat Rawat
भाजपा नेत्याच्या कथितरित्या जवळच्या असलेल्या प्रवेश शुक्ला या व्यक्तीने दारू पिऊन दशमत रावत यांच्यावर लघवी केली होती. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर, तीव्र प्रतिक्रिया उमटल्या यावर बुधवार, ५ जुलै रोजी पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एनएसएही लावण्यात आला आहे. एवढंच नाही तर, बुधवार, ५ जुलै रोजीच आरोपी प्रवेश शुक्लाच्या घरावरही बुलडोझरची कारवाई झाली. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, “आरोपी (प्रवेश शुक्ला) लॉकअपमध्ये आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.’’
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दशमत यांचे पाय धुवत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि म्हटले आहे की, ‘’हा व्हिडीओ मी यासाठी सर्वांबरोबर शेअर करतो आहे की, सर्वांनी लक्षात घ्याव की मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान आहे, तर जनता देव आहे. कोणावरही अत्याचार सहन केला जाणार नाही, राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान माझा सन्मान आहे.’’
https://youtube.com/shorts/sJei-BW8InU?feature=share
Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan meets Dashmat Rawat
महत्वाच्या बातम्या
- Gurpatwant Singh Pannu: अमेरिकेत कार अपघातात खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा मृत्यू झाल्याचा दावा!
- राष्ट्रवादीतले अधोरेखित 3 : 83 वर्षांचा योद्धा मैदानात; पण 54 वर्षांची योद्धा अजूनही “राजकीय कवचात”!!
- 69 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला 64 वर्षांचे नेते निघाले होते, बैल बाजार दाखवायला!!; आज ते 83 वर्षांचे योद्धा आहेत
- ‘’…तर पेट्रोल १५ रुपये प्रतिलिटर मिळू लागेल’’, नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला!