वृत्तसंस्था
भोपाळ : देशाच्या शैक्षणिक इतिहासात एक महत्त्वाचे पाऊल आज टाकले जात आहे. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेला महत्त्व यावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करत वैद्यकीय शिक्षण मातृभाषा हिंदीतून देणारे मध्य प्रदेश आज पहिले राज्य ठरत आहे. नियमित वैद्यकीय शिक्षणात अभ्यासक्रमातली पाठ्यपुस्तके मध्य प्रदेश राज्य सरकारने हिंदी मध्ये तयार केली असून त्याच्या प्रकाशनाचा समारंभ आज होतो आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भोपाळच्या परेड ग्राउंड वर एका भव्य कार्यक्रमात या पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन होईल. Madhya Pradesh becomes the first state to offer MBBS medical education through mother tongue Hindi
वैद्यकीय शिक्षण हे मातृभाषा हिंदीतून देणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि सरकारचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी दिली आहे. एमबीबीएस पहिल्या वर्षीच्या 4 पैकी 3 वैद्यकीय पाठ्यपुस्तकांचे इंग्रजीतून हिंदीत भाषांतर करण्यात आले आहे. या पुस्तकांचे भाषांतर करण्याचे काम सोपे नसून वैद्यकीय शिक्षण विभागाने वॉर रुम तयार करून सातत्याने 4 महिने काम करुन ही पुस्तके अनुवादित केली आहेत. यासाठी राज्यातील 97 डॉक्टरांनी परिश्रम घेतले आहेत.
हिंदीतून अभ्यास करणारे विद्यार्थी मागे राहणार नाहीत
3 विषयांची पाठ्यपुस्तके ही तज्ज्ञांच्या समितीनं तयार केली आहेत. रक्तदाब, पाठीचा कणा, हृदय, किडनी, यकृत किंवा शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांसारख्या तांत्रिक संज्ञा या पुस्तकात चांगल्या पद्धतीनं देण्यात आल्या आहेत. ज्यांनी हिंदीमध्ये एमबीबीएसचा अभ्यास केला आहे ते अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मागे पडणार नाहीत अशी पाठ्यपुस्तकांची रचना असेल.
एका नव्या युगाची सुरुवात होणार
हिंदी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी हिंदी माध्यमाचे विद्यार्थी खूप उत्सुक आहेत. मध्य प्रदेश सरकारचा हा मोठा उपक्रम आहे. मध्य प्रदेशने अनेक इतिहास रचले आहेत. मात्र, आज एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे. इंग्रजीशिवाय कोणीही अभ्यास करूच शकत नाही ही मानसिकता आपण बदलली पाहिजे.
देशात वैद्यकीय शिक्षण आता हिंदीत करता येणार आहे. त्याची सुरुवात मध्य प्रदेशातून होत असून, आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे शिवराजसिंह म्हणाले. आम्ही इंग्रजी भाषेच्या विरोधात नाही, पण इंग्रजीशिवाय काम होऊ शकत नाही या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे. इंग्रजी येत नसल्याने अनेक मुले वैद्यकीय शिक्षण सोडतात असेही ते म्हणाले.
Madhya Pradesh becomes the first state to offer MBBS medical education through mother tongue Hindi
महत्वाच्या बातम्या
- सोने तस्करी प्रकरणाची ईडी केस कर्नाटकात हलवायला केरळच्या डाव्या सरकारचा विरोध
- मुंबईत रस्त्यांच्या कामांसाठी 6 अर्बन डिझाईन कंसल्टंटसची निवड; शिंदे – फडणवीस सरकारने बदलला पॅटर्न; कसा तो वाचा
- वर्षा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी : राज ठाकरे यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे तीन नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??