• Download App
    एलपीजीचे कनेक्शन ८५ टक्के कुटुंबापर्यंत पोचले; १५ टक्के कुटुंबापर्यंत पोचणे बाकी; ऊर्जा पर्यावरण आणि पाणी परिषदेचा निष्कर्ष । LPG connections reach 85% of households; Reaching out to 15% of households; Conclusion of the Energy Environment and Water Council

    एलपीजीचे कनेक्शन ८५ टक्के कुटुंबापर्यंत पोचले; १५ टक्के कुटुंबापर्यंत पोचणे बाकी; ऊर्जा पर्यावरण आणि पाणी परिषदेचा निष्कर्ष

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील ८५ टक्के कुटुंबांपर्यंत स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन पोचले आहे. त्याचा ७० टक्के कुटुंबे प्राथमिक इंधन म्हणून वापर करत आहेत. परंतु अजून १५ टक्के कुटुंबे कनेक्शनपासून दूर आहेत, अशी माहिती एका अभ्यासातून उघड झाली आहे. LPG connections reach 85% of households; Reaching out to 15% of households; Conclusion of the Energy Environment and Water Council

    ऊर्जा पर्यावरण आणि पाणी परिषद (CEEW) यांनी गॅस कनेक्शनबाबत अभ्यास केला. तेव्हा ही बाब उघड झाली आहे. दुसरीकडे ५४ टक्के नागरिक अजूनही पारंपरिक इंधनाचा वापर करत आहेत.

    स्वयंपाक बनविण्यासाठी भारतीय प्रामुख्याने पारंपारिक घन इंधनांचा वापर करतात. त्यामध्ये शेण, लाकूड, कोळसा, शेतीचे अवशेष आणि केरोसीन यांचा समावेश आहे. त्यामुळे घरगुती वायू प्रदूषण वाढते. ते रोखण्यासाठी गेल्या महिन्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कोटी गरीब आणि स्थलांतरित कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० चे उद्घाटन केले.



    ऊर्जा पर्यावरण आणि पाणी परिषदेच्या अभ्यासात असे उघड झाले की, ३९ टक्के कुटुंबे ही गॅससोबत पारंपरिक इंधनाचा वापर करत आहेत. तर ८४ टक्के कुटुंबे गॅसचे दर वाढल्याने त्याचा जास्त वापर करत नाहीत. एका वर्षात गॅसच्या किमती ४० टक्के म्हणजे २४० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे गॅसचा वापर कमी होत आहे.

    ऊर्जा पर्यावरण आणि पाणी परिषदेच्या कार्यक्रमाच्या वरिष्ठ अधिकारी शालू अग्रवाल म्हणाल्या, उज्ज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक कुटुंबापर्यंत गॅस कनेक्शन देण्याचा केंद्र सरकारचा उपक्रम कौतुकास्पद होता. परंतु अद्याप १५ टक्के कुटुंबापर्यंत ते पोचलेले नाही. त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे पारंपरिक इंधनाचा वापर कमी होण्यास मदत मिळते. त्या बरोबर सरकारने गॅस सिलंडरसाठी अनुदान देण्याची योजना पुन्हा राबवावी. तसेच गॅस सिलंडर लोकांपर्यंत लवकर कसे पोचतील, याचाही विचार करावा.

    LPG connections reach 85% of households; Reaching out to 15% of households; Conclusion of the Energy Environment and Water Council

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित