विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पहिले 4 टप्पे पार पडले. त्यामध्ये देशातल्या सगळ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र मतदानात मागे राहिला. सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राचा मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणावर घसरला. त्याबद्दल महायुतीत भाजप आणि शिवसेनेमध्ये चिंतेचे वातावरण आहे, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र मुख्यमंत्रीपदाची उबळ आली आहे. Lower turnout of voters in maharashtra, but ajit pawar’s NCP eyes on chief ministership
महाराष्ट्रात पहिल्या चारही टप्प्यांमधल्या मतदानामध्ये संपूर्ण देशात सर्वांत कमी मतदान झाले आहे. मतदानाने 55 % ते 60 % टक्क्यांचा टप्पा देखील ओलांडलेला नाही. इतर राज्यांनी मात्र मतदानाने 65 % ते 75 % टप्पा ओलांडला. याबद्दल महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप मध्ये चिंतेचे वातावरण आहे, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र त्याचा मागमूसही दिसत नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हिरीरीने निवडणूक लढवत असलेल्या शिरूर मतदार संघात आज सर्वांत कमी मतदान झाले. त्याबद्दल राष्ट्रवादीचे कुठलेही नेते बोललेले आढळले नाहीत, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत मात्र महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली.
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री होईल का??, असा प्रश्न खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारला. त्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असे कोणाला वाटले नव्हते, पण ते मुख्यमंत्री झाले. आमच्याही पक्षातल्या नेत्याला संधी मिळावी, असे आम्हाला वाटते. राजकारणात इच्छा प्रत्येकाला असते, पण ती वास्तवाशी जोडून घ्यावी लागते.
शरद पवार यांच्या विषयी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, मला शरद पवार यांच्याबद्दल आयुष्यभर आदर राहील. मी कधीही शरद पवार यांना भेटेन. मला शरद पवार यांना भेटण्यात काहीही अडचण नाही. मागच्यावेळी नेहरू सेंटरला विश्वस्तांची बैठक होती. मी विश्वस्त होतो. त्यामुळे मी तेथे गेलो होतो. एखाद्या संस्थेच्या कामासाठी किंवा मला शरद पवार कुठे दिसले आणि त्यांचे लक्ष नसले तरी मी त्यांच्याकडे जाईल आणि त्यांची विचारपूस करेन.
राष्ट्रवादी सत्तेत येण्याचे प्रयत्न चारवेळा फसले. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का??, असा प्रश्न विचारला असता त्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकतं. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असं वाटलं होतं का? त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाला नेतृत्व मिळावं किंवा आमच्या नेत्याला मुख्यमंत्री करावं, यासाठी आमचा प्रयत्न का राहणार नाही? मात्र, प्रत्येक गोष्टीला आपल्याला रिअॅलिटीशी जोडूनच प्रयत्न करावे लागतात. इच्छा प्रत्येकाची असते. शरद पवार यांचीही पंतप्रधान होण्याची इच्छा होती, पण ते नाही झाले. जेव्हा संधी आली होती, तेव्हा त्यांनी ती गमावली.
राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या 25 वर्षांत महाराष्ट्रात कधीही पूर्ण बहुमत मिळवता आले नाही. किंबहुना पक्षाचे 100 आमदार सोडा, 75 आमदारही कधी निवडून आणता आले नाहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या वळचणीला जाऊन सातत्याने सत्तेला चिकटून राहिली. आता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 42 आमदारांसह भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आली आहे. राष्ट्रवादीचे कुठलेच नेते कधीच स्वबळावर पूर्ण बहुमताच्या गोष्टी करत नाहीत. तसे त्यांचे प्रयत्नही दिसत नाहीत. पण कायम सत्तेवर राहण्याचा त्यांचा होरा दिसतो आणि अधून मधून त्यांची मुख्यमंत्री पदाची उबळ उसळून वर येते.
Lower turnout of voters in maharashtra, but ajit pawar’s NCP eyes on chief ministership
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!