• Download App
    लव्ह जिहाद अंडर इंटरफेथ मॅरेज..Love Jihad Under Interfaith Marriage..

    लव्ह जिहाद अंडर इंटरफेथ मॅरेज..

    लव्ह जिहादच्या मुद्द्यावर शुक्रवारी विधानसभेत मोठाच गदारोळ झाला. महाराष्ट्रात सध्याच 1 लाखाहून जास्त लव्ह जिहादच्या केसेस सापडल्या आहेत. असे सांगण्यात आले. त्यावर लव्हजिहादीस्ट ‘हे लव्ह जिहादच प्रकरण नसून “इंटरफेथ मॅरेज” आहे.’ असे म्हटले. हे ऐकून मुलगी म्हणून डोक्यात तिडीक गेली आणि आपण किती सेफ आहोत? असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. Love Jihad Under Interfaith Marriage..

    इंटरफेथ मॅरेजच्या नावाखाली लव जिहाद झाकायचा या पुढारलेल्या नेत्यांनी प्रयत्न केला. तरीही तसं होणार नाही. कारण ‘कोंबडं किती झाकायचं ठरवलं, तरी ते आरवायचं राहत नाही.’ आधी भीतीपोटी लव्ह जिहादच्या शिकार झालेल्या मुली समोर येत नव्हत्या. पण आता आपल्याला न्याय मिळू शकेल. या होपने या मुली स्वतःहून पुढे येत आहेत. त्यामुळे या केसेस उघडकीस येऊन. त्यातूनच हा आकडा आपल्या डोळ्यासमोर आला आहे. तेव्हा इंटरफेथ मॅरेजच्या पदराखाली लव्ह जिहाद नावाचं हे नाजायस कार्ट कितीही लपवायचं ठरवलं तरी आता ते लपणार नाही हे पक्के आहे.

    आम्ही लव्ह जिहादला सपोर्ट करत नाही. असे एका बाजूला हे पुढारलेले लोक पुढालेले नेते म्हणतात. तर मग याच केसेस मधून मुली जर यातून बाहेर येऊ इच्छित आहेत तर लव्ह जिहादच्या कायद्याला यांचा अपोज का? लव जिहाद नावाचा सर्प आज मुलींना विळख्यात अडकवून आपला विषारी डंख मारत आहे. जरी या विळख्यातून त्यांची सुटका होत असेल. तर या पुढारलेल्या नेत्यांना लव्ह जिहादचा कायदा आणायला हरकत तरी काय?

    या केसेस लव्ह जिहादच्या नसून इंटरफेथ मॅरेजच्या आहेत. असे या पुढारलेल्या नेत्यांची मते आहेत. तर तसे नाही. कारण मुलीला गोड गोड बोलून फसवून तिच्याशी लग्न करून तिला धर्मांतर करायला लावायचे. व चार मुले झाल्यावर तिला सोडून द्यायचे. याला लव्ह जिहाद म्हणतात. 4 वर्षे लिविंगमध्ये राहिल्यानंतर जर का ती मुलगी लग्नाचा हट्ट धरत असेल. तर तिचे 35 तुकडे करायचे याला लव्ह जिहाद म्हणतात. माझे तुझ्यावर प्रेम नाही. असा स्पष्ट नकार दिल्यानंतर सुद्धा, सतत तिच्या मागे लागून, तिला धमक्या देऊन, तिला धर्मांतर करण्यास भाग पाडायचे. याला लव्ह जिहाद म्हणतात. धर्म लपवत त्या मुलीशी लग्न करून. मग आपला खरा तिचा चेहरा समोर आणायचा व तिला धर्मांतर करण्यास भाग पाडायचे. याला लव्ह जिहाद म्हणतात. या आणि अशा कैक केसेसला लव्ह जिहाद म्हणतात इंटरफेथ मॅरेज नाही.

    Love Jihad Under Interfaith Marriage..

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही