• Download App
    लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही, धर्मांतराचा सर्वांना अधिकार; काँग्रेस नेते गोविंद सिंहांचे वक्तव्य Love Jihad does not exist, everyone has the right to convert; Statement of Congress leader Govind Singh

    लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही, धर्मांतराचा सर्वांना अधिकार; काँग्रेस नेते गोविंद सिंहांचे वक्तव्य

    प्रतिनिधी

    भोपळ : मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार डॉ. गोविंद सिंह यांच्या विधानाने राज्यात खळबळ उडाली आहे. लव्ह जिहादला खोटे ठरवत त्यांनी लव्ह जिहाद कधीच अस्तित्वात नव्हते आणि नाही, धर्मांतर करण्याचा सर्वांना अधिकार आहे, असे म्हटले आहे. गोविंद सिंह यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठविली आहे. Love Jihad does not exist, everyone has the right to convert; Statement of Congress leader Govind Singh

    भाजपने काँग्रेसवर केले गंभीर आरोप 

    विरोधी पक्षनेते गोविंद सिंह यांच्या लव्ह जिहादसंदर्भातील वक्तव्यावर भाजप नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी ‘इटलीच्या राणीच्या दरबारी राहून दुसरी प्रतिक्रिया अपेक्षित नाही. धर्म परिवर्तन हा कायदेशीर गुन्हा आहे. मध्य प्रदेशात निष्पाप मुलींची दिशाभूल करून त्यांची मालमत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांचे जबरदस्तीने केलेले धर्मांतर हे घृणास्पद कृत्य असून, मध्य प्रदेशात धर्मांतराचे दुष्कृत्य खपवून घेतले जाणार नाही. काँग्रेसवर गंभीर आरोप करत मंत्री सारंग म्हणाले की, काँग्रेस नेहमीच धर्मांतर करत आली आहे. धर्मांतर करणाऱ्यांना संरक्षण दिल्याचा आरोपही काँग्रेसवर होत आहे.

    लव्ह जिहादचे नियोजित षडयंत्र सुरू आहे

    तर दुसरीकडे नगरविकास मंत्री भूपेंद्र सिंह म्हणाले की, मुलीचे ३५ तुकडे करणे म्हणजे लव्ह जिहाद नाही, मग ते काय आहे? लव्ह जिहादचे सुनियोजित षडयंत्र देशभर सुरू आहे. काँग्रेस सर्वत्र तुष्टीकरणाचे राजकारण करते. हे सर्व काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा परिणाम आहे. ते म्हणाले की, आता देशाला समान नागरी संहितेची गरज आहे. या सर्व दिशेने भाजप सरकार विचार करत आहे.

    म्हणे धर्मांतर करणे कायदेशीर अधिकार  

    विशेष म्हणजे इंदूरमध्ये तंट्या भील यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लव्ह जिहादबद्दल सांगितले होते की, मी मध्य प्रदेशच्या भूमीवर लव्ह जिहाद खपवून देणार नाही. जो कोणी हिंदू मुलींची फसवणूक करेल, त्यांच्याशी लग्न करेल आणि त्यांचे 35 तुकडे करेल, आम्ही ते सहन करणार नाही. गरज पडल्यास लव्ह जिहादविरोधात नवा कडक कायदा करण्यात येईल. सीएम शिवराज यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते गोविंद सिंह यांनी धर्मांतराच्या बाजूने बोलतांना लव्ह जिहाद पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले. धर्मांतराच्या समर्थनार्थ त्यांनी विधान केले आहे. धर्मांतर करणे हा कायदेशीर अधिकार असल्याचे सांगितले. संविधानाने कोणालाही कोणताही धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. हे सर्व भाजपचे संविधान बदलण्याचे षडयंत्र आहे, असेही ते म्हणाले.

    Love Jihad does not exist, everyone has the right to convert; Statement of Congress leader Govind Singh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य