‘प्रेमाच्या नावावर हत्या आणि धर्मांतर होत असून त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हटलं जात आहे’’ असंही ते म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : सध्या देशात लव्हच्या नावाखाली लव्ह जिहादचा खेळ जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांत लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी भोपाळमध्ये मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की भारत ही प्रेमाची भूमी होती आणि राहील. प्रेमाच्या नावावर हत्या आणि धर्मांतर होत असून लोक त्याला लव्ह जिहाद म्हणत आहेत, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. Love Jihad Cheating partner is love or betrayal Rashtriya Swayamsevak Sangh leader Indresh Kumars question
आरएसएस नेते इंद्रेश कुमार म्हणाले, “जोडीदाराची फसवणूक करून प्रेम करणे हे प्रेम आहे की फसवणूक? आज प्रेमाच्या नावावर वासनेचा धंदा सुरू आहे. प्रेमाला कलंकित केले जात आहे. भारत ही प्रेमाची भूमी होती, आहे आणि राहील.” लव्हच्या नावावर खून आणि धर्मांतर होत आहे आणि लोकांनी त्याला लव्ह जिहाद म्हटले जात आहे. आम्ही प्रेमाच्या नावावर फसवणूक आणि हिंसाचाराचा निषेध करतो.”
काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये राष्ट्रीय बेसबॉलपटू संजना हिने राजन उर्फ बड्डो याच्याशी नाराज होऊन आत्महत्या केली होती. अब्दुल मन्सूरी धर्मांतरासाठी संजनाचा छळ करत असल्याचा आरोप संजनाच्या वडिलांनी केला आहे. संजनाच्या वडिलांनी सांगितले की, अब्दुलने आपल्या मुलीला त्याचे नाव राजन सांगितले. मात्र, राजनच्या मागे लपलेल्या अब्दुलचे सत्य जेव्हा संजनाला कळले तेव्हा तिने या गोष्टी आईला सांगितल्या. अब्दुल आपल्या मुलीला धमकावत असे, असा आरोपही मृत संजनाच्या वडिलांनी केला आहे.
Love Jihad Cheating partner is love or betrayal Rashtriya Swayamsevak Sangh leader Indresh Kumars question
महत्वाच्या बातम्या
- केंद्राच्या अध्यादेशाविरोधात ‘आप’ची मेगा रॅली, रामलीला मैदानावर 1 लाख लोक हजर राहणार असल्याचा दावा
- अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना तिहेरी तलाक, राम मंदिरावर प्रश्न विचारत साधला निशाणा, म्हणाले…
- मोदी सरकारने 9 वर्षात रचला विकसित भारताचा पाया; महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा नांदेडमधून अमित शाहांचा हुंकार
- द केरला स्टोरी नंतर दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा.