विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशभर कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत असताना लसीकरणाला मात्र पुरेसा वेग येताना दिसत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील ३.८६ कोटी लोकांनी निर्धारित वेळेमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द केंद्र सरकारनेच दिली आहे.Lot of people didn’t took second dose in time
‘आरटीआय’अंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. कोविन या पोर्टलवरील गुरूवार दुपारपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर ४४,२२,८५,८५४ लोकांनी पहिला डोस घेतला असून १२,५९,०७,४४३ एवढ्या जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते रमण शर्मा यांनी ‘आरटीआय’अंतर्गत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींचा पहिला डोस घेणारे पण निर्धारित वेळेत दुसरा डोस न घेणाऱ्या लोकांची आकडेवारी मागविली होती. त्यांच्या या प्रश्नाणला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या लस प्रशासन विभागाने उत्तर दिले असून त्यात त्याने म्हटले आहे, की कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४-११२ दिवसांच्या फरकांनी दुसरा डोस घेणेही गरजेचे आहे.
कोव्हॅक्सिनसाठी हे अंतर २८-४२ दिवस ठेवण्यात आले होते. कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर निर्धारित वेळेमध्ये दुसरा डोस न घेणाऱ्या लोकांची संख्या ही ३,४०,७२,९९३ (१७ ऑगस्ट २०२१ च्या आकडेवारीनुसार) असून कोव्हॅक्सिनबाबत हे प्रमाण ४६,७८,४०६ एवढे आहे.
Lot of people didn’t took second dose in time
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाची लस गावकऱ्यांना विकताना आरोग्य कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले
- बिहार, झारखंडमध्ये पुराचे थैमान; भागलपूरला सर्वाधिक मोठा फटका
- अफगाणिस्तानमध्ये लोकशाही व्यवस्था येणार नाही, शरीयत कायदा लागू करण्याचे तालिबानचे संकेत
- विज्ञानाची गुपिते : झाडातील विशिष्ठ् ग्रंथीमुळेच फुलांना येतो सुगंध
- महिला, मुलांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या तालिबानला काही जणांचा निर्लज्जपणे पाठिंबा – योगी आदित्यनाथ यांची टीका