गुड्डू मुस्लीम आणि साबीर यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उमेश पाल हत्याकांडातील अतिक अहमदची फरार पत्नी शाइस्ता परवीन, गुड्डू मुस्लीम आणि साबीर यांच्याविरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. आता ते देश सोडून परदेशात पळून जाऊ शकत नाहीत. लुकआउट नोटीसचा कालावधी एक वर्षाचा आहे. पोलीस आयुक्तालयाचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता, त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे. Lookout notice issued against Atiq Ahmeds fugitive wife Shaista Parveen Guddu Muslim and Sabir
या तिघांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेशशिवाय अनेक राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले, मात्र कोणताही सुगावा लागला नाही.गुड्डू मुस्लीम आणि साबीर यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस असून त्यांची नावे लुकआउट नोटीसमध्ये आहेत. शाइस्ता परवीनवर ५० हजारांचे बक्षीस आहे. लुकआउट नोटीस जारी झाल्यानंतर आता हे तिघेही देश कुठेही पळून जाऊ शकत नाहीत.
शाईस्ताने अतिकला प्रत्येक गुन्ह्यात दिली साथ –
पोलीस अनेक महिन्यांपासून शाइस्ता परवीनचा शोध घेत होते. अतीक अहमदसोबत लग्न झाल्यापासून शाइस्ताने अतीकला प्रत्येक गुन्ह्यात तितकीच साथ दिली. उमेश पाल खून प्रकरणाच्या वेळी अतिक अहमद अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात बंद होते. त्यावेळी शाइस्ता परवीन बाहेर होती. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी यूपी पोलीस शाइस्ताचा शोध घेत आहेत.
Lookout notice issued against Atiq Ahmeds fugitive wife Shaista Parveen Guddu Muslim and Sabir
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आज शक्य, काँग्रेस निरीक्षकांनी खरगे यांना अहवाल सादर केला; डीके शिवकुमार आज दिल्लीला जाणार
- आमच्या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले, राजस्थानच्या काँग्रेस मंत्र्यांचा मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर खळबळजनक आरोप
- पाकिस्तानच्या कोळसा खाणीत हद्दवाढीवरून वाद विकोपाला, रक्तरंजित संघर्षात तब्बल 16 जणांचा मृत्यू
- प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला, जास्त खुश होऊ नका, 2013 मध्ये विजयी होऊनही 2014 मध्ये पराभूत झाला होता