विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या कलांमध्ये मोठा फेरबदल झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आपापल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीचे निकाल एकतर्फी लागत नसून मतदारांनी संतुलित कौल दिल्याचे निवडणूक आयोगाने अधिकृत रित्या जाहीर केलेल्या मतांच्या कलाच्या आकडेवारीतून दिसत आहे. Loksabha elections 2024 results :
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, नितीन गडकरी, किरण रिजीजू, हे सगळे नेते मोठ्या आघाडीवर असून बारामतीतून सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती, पण नंतरच्या टप्प्यात त्या काहीशा पिछाडीवर गेल्याचे दिसले.
महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात 24 – 23 अशी जोरदार टक्कर दिसत आहे प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 216 मतदारसंघांमध्ये भाजप, तर 78 मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. आम आदमी पार्टी 5 आणि अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी 29 जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पार्टीचे कल टप्प्याटप्प्याने पिछाडीवर येत आहेत.
महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रतिष्ठेच्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आघाडी घेतली होती. पण नंतर त्या काहीशा पिछाडीवर गेल्या सोलापुरातून काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे, परभणीतून संजय जाधव, कोल्हापूरातून शाहू महाराज, हातकणंगलेतून सत्यजित पाटील सरूडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. यवतमाळ मधून भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर आहेत. सर्व मतदारसंघातले पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण झाली असून आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मतांमधली मतमोजणी सुरू झाली आहे.
Loksabha elections 2024 results
महत्वाच्या बातम्या
- निकालाआधीच उद्धव ठाकरेंना झटका; 20 मेच्या पत्रकार परिषदेप्रकरणी निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
- मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; 10व्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन, सुसाईड नोटही सापडली
- नेहरूंनी हॅटट्रिक केली, राजीव 400 पार गेले, तेव्हा लोकशाही “टिकून” “बळकट” झाली; पण मग मोदींनी हॅटट्रिक केली तर…??
- फडणवीसांच्या निकटवर्ती नेत्याचा ठाकरेंशी संपर्क की माध्यमेच फेक न्यूज देऊन टीआरपी वाढविण्यात दंग??