• Download App
    Waqf Amendment Bill वक्फ सुधारणा बिल लोकसभेत सादर होताच काँग्रेस

    Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा बिल लोकसभेत सादर होताच काँग्रेस, समाजवादीसह सर्व विरोधकांचा तीळपापड; मुस्लिमांना भडकावयला सुरुवात!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने बहुप्रतिक्षित वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याचे बिल लोकसभेत सादर झाल्याबरोबर काँग्रेस, समाजवादी पार्टीसह सगळ्या विरोधकांचा तीळपापड झाला आणि त्यांनी मुस्लिमांना भडकावयला सुरुवात केली.

    लोकसभेत आणि लोकसभेच्या बाहेर देखील विरोधकांनी मुस्लिमांच्या भडकवाभडकवीला सुरुवात केली. केंद्रीय कायदेमंत्री किरण रीजिजू यांनी लोकसभेत वफ्क बोर्ड सुधारणा बिल मांडले. त्यानंतर काँग्रेसचे संघटन सचिव खासदार के. सी. वेणुगोपाल, समाजवादी पार्टीचे खासदार अफजल अन्सारी, द्रविड मुन्नेत्र कळघमच्या खासदार कनिमोझी हे सगळेजण सरकारवर तुटून पडले. सरकार वक्फ बोर्ड सुधारणा कायदा आणून राज्यघटनेच्या कलम 30 चे उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. के. सी. वेणूगोपाल यांनी आपण हिंदू असल्याचा घोष केला, पण काँग्रेस अल्पसंख्याकांचे विशेष अधिकार जपत असल्याचा दावा त्यांनी केला.

    समाजवादी पार्टीचे खासदार अफजल अन्सारी यांनी सरकारच वरच हेत्वारोप केला. इतरांच्या जमिनी हाडपा आणि स्वतःच्या दलालांना द्या, या हेतूनेच सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा बिल आणण्याचा आरोप अन्सारी यांनी केला. लोकसभेतले काँग्रेसचे उपनेते तरुण गोगई यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध सुधारणा बिल आणल्याचा आरोप केला, पण या सगळ्यांमध्ये मुस्लिमांनी आता या बिला विरोधात रस्त्यावर आले पाहिजे, अशी चिथावणी दिली.

    मूळात वक्फ बोर्ड सुधारणा बिल हे काँग्रेसनेच नेमलेल्या सच्चर कमिटीने दिलेल्या रिपोर्टच्या आधारावर बनविले असल्याचा खुलासा किरण रीजिजू यांनी लोकसभेत केला. काँग्रेस सह समाजवादी पार्टी आणि बाकीच्या सर्व विरोधी खासदारांनी केलेले आरोप त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावले.

    Lok Sabha on Waqf Amendment Bill

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!