विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही, की कोणीही येऊन इथे बसावं, अशा परखड शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना ठणकावले. केंद्रातल्या मोदी सरकारने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट 2025 विधेयक लोकसभेत मांडले. त्यावर सर्व सदस्यांनी साधक बाधक चर्चा केली. चर्चेला गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले.
अमित शाह म्हणाले :
भारताच्या भूमीने जगभरात प्रताडीत झालेल्या अल्पसंख्यांक समुदायांना नेहमीच आश्रय दिला. त्यामध्ये पारशी, येहुदी यांचा समावेश राहिला. या समुदायांनी देखील भारतीय समुदायांमध्ये मिसळून भारताच्या विकासामध्ये मोठे योगदान केले.
आज सुद्धा भारतात व्यापारासाठी शिक्षणासाठी किंवा संशोधनासाठी येणाऱ्या कुठल्याही देशाच्या नागरिकाचे भारतात स्वागत आहे. त्यांनी त्यांच्या देशाबरोबरच भारताच्याही प्रगतीसाठी योगदान केले, तर त्याबद्दल त्यांचे आम्ही स्वागतच करतो.
पण केवळ भारताची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी किंवा या देशात उत्पात आणि हिंसाचार माजवण्यासाठी कोणी घुसखोर येत असेल, तर त्याला मात्र आम्ही कठोर कायद्याने दंड करून हाकलून देऊ. याचे कठोर प्रावधान इमिग्रेशन अंड फॉरेनर्स एक्ट 2025 मध्ये आहे. या प्रावधानाला काही सदस्यांनी विरोध केला. परंतु, देशाच्या सुरक्षेसाठी हे प्राधान्य आवश्यक आहे. देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्व यांच्याशी मोदी सरकार अजिबात तडजोड करणार नाही.
भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही की इथे कोणीही येऊन केव्हाही बसावं, आपल्याला वाटेल ते करावं. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना या देशात अजिबात स्थान नाही. आम्ही कठोर कायदेशीर मार्गाने त्यांना या भारतातून बाहेर काढू.
Lok Sabha on the Immigration and Foreigners Bill, 2025, Amit Shah
महत्वाच्या बातम्या
- MK Stalin तामिळनाडूत DMK स्टालिन अण्णा सरकारची दुटप्पी भूमिका; हिंदीला लाथा, अन् उर्दूला डोक्यावर घेऊन नाचा!!
- UPI : १ एप्रिलपासून UPI मध्ये होणार मोठा बदल!
- धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाचा “शाब्दिक खेळ”; देवेंद्र फडणवीसांनी उलगडला आणीबाणीतला “गेम”!!
- Bhupesh Baghel : महादेव बेटिंग अॅप प्रकरणात भूपेश बघेल यांच्या घरावर CBIचे छापे