• Download App
    लोकसभा पोटनिवडणूक; मंडीत टायगर हिलच्या विजयी वाघाचा सन्मान; मध्य प्रदेश, दादरा नगर हवेलीतून भाजपचे मराठी उमेदवार । Lok Sabha by-elections; Mandy honors Tiger Hill’s victorious tiger; BJP's Marathi candidate from Madhya Pradesh, Dadra Nagar Haveli

    लोकसभा पोटनिवडणूक; मंडीत टायगर हिलच्या विजयी वाघाचा सन्मान; मध्य प्रदेश, दादरा नगर हवेलीतून भाजपचे मराठी उमेदवार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार यादी जाहीर केली असून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कारगिल युद्धात टायगर हिलच्या विजयाचे शिल्पकार ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे, तसेच मध्य प्रदेश मधील खांडवा आणि दादरा नगर हवेली या मतदार संघांमध्ये दोन मराठी नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. Lok Sabha by-elections; Mandy honors Tiger Hill’s victorious tiger; BJP’s Marathi candidate from Madhya Pradesh, Dadra Nagar Haveli

    महेश गावित या आदिवासी नेत्याला भाजपने दादरा नगर हवेलीतून मैदानात उतरवले आहे, तर मध्य प्रदेशातील खांडवा मधून ज्ञानेश्वर पाटील या मराठी नेत्याला मैदानात उतरवले आहे.



    ब्रिगेडियर भूषण ठाकूर हिमाचल प्रदेशातील रहिवासी आहेत 1999 च्या कारगिल युद्धामध्ये त्यांनी आघाडीवर राहून सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. सुप्रसिद्ध टायगर हिलच्या विजयाच्या वेळी ते तिथल्या तैनात असलेल्या ब्रिगेडचे कमांडिंग ऑफिसर होते. टायगर हिलच्या विजयामध्ये त्यांचा वाघाचा वाटा होता. भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर करून एका सैनिकाचा सन्मान केल्याची भावना व्यक्त होत आहे, तर दादरा नगर हवेलीमध्ये महेश गावित या आदिवासी नेत्याला मैदानात उतरून उतरवून तिथल्या पारंपरिक राजकीय समीकरणांना धक्का देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. तसेच खांडव मतदारसंघातून मराठी नेते ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी देऊन तेथील अठरा टक्के मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो आहे.

    भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली असली तरी अद्याप काँग्रेसची उमेदवार स्क्रुटीनी समितीची बैठकच अजून व्हायची आहे ही बैठक झाल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

    Lok Sabha by-elections; Mandy honors Tiger Hill’s victorious tiger; BJP’s Marathi candidate from Madhya Pradesh, Dadra Nagar Haveli

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!