• Download App
    आसाम - मिझोराम संघर्ष यावरून लोकसभेत, तर पेगासस मुद्द्यावरून राज्यसभेत सरकारची कोंडी करण्याची काँग्रेसची रणनीती। Lok Sabha adjourned till 11.45 am amid sloganeering in the House by Opposition MPs.

    आसाम – मिझोराम संघर्ष यावरून लोकसभेत, तर पेगासस मुद्द्यावरून राज्यसभेत सरकारची कोंडी करण्याची काँग्रेसची रणनीती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या आठवड्यात सुरुवातीला आसाम – मिझोराम संघर्ष यावरून लोकसभेत, तर पेगाससच्या मुद्यावरून राज्यसभेत केंद्र सरकारची कोंडी करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. Lok Sabha adjourned till 11.45 am amid sloganeering in the House by Opposition MPs.

    केंद्र सरकार या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहे परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी दोन्ही सभागृहांमध्ये स्थगन प्रस्ताव दिले आहेत. राज्यसभेत काँग्रेस सदस्यांनी पेगाससच्या मुद्द्यावरून गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज तहकूब करणे भाग पाडले.

    लोकसभेत काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई आणि खासदार मणिक्कम टागोर यांनी आसाम – मिझोराम संघर्ष वरून स्थगन प्रस्ताव दिला आहे. आसाम आणि मिझोराम यांच्यातील संघर्ष दोन राज्यांमधल्या आहे की दोन देशांमधला आहे?, असा सवाल गौरव गोगोई यांनी केला. केंद्र सरकारच्या भूमिकेविषयी त्यांनी दाट संशय व्यक्त केला. आसाम आणि मिझोराम मध्ये भाजप आणि एनडीए यांच्या नेतृत्वाखालील सरकारे असताना देखील एवढा हिंसक संघर्ष होतोच कसा?, यावर गोगोई यांनी ठळक प्रश्नचिन्ह लावले.

    केंद्र सरकारची सर्व मुद्द्यांना उत्तरे देण्याची तयारी आहे. परंतु काँग्रेस आणि अन्य विरोधक सभागृहे चालू देत नाहीत त्यामुळे त्यांना उत्तरे मिळत नाहीत, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत स्पष्ट केले. परंतु काँग्रेसने संशोधित केलेली कोंडी सत्ताधारी भाजपला आणि इंडियाला फोडता आलेले नाही.

    Lok Sabha adjourned till 11.45 am amid sloganeering in the House by Opposition MPs.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य