• Download App
    लोकजनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा आरोप, चिराग पासवान यांचे आहेत चुलतभाऊ|Lok Janshakti MP Prince Raj is accused of rape, Chirag Paswan's cousin

    लोकजनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा आरोप, चिराग पासवान यांचे आहेत चुलतभाऊ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे समस्तीपूरचे खासदार आणि चिराग पासवान यांचे चुलत भाऊ प्रिन्स राज यांच्यावर एका तरुणीने प्रिन्स बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या राउस एव्हेन्यू कोर्टाच्या आदेशानंतर प्रिन्स राज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Lok Janshakti MP Prince Raj is accused of rape, Chirag Paswan’s cousin

    त्याचबरोबर तरुणीने प्रिन्स राज यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मदत केली नसल्याचा आरोप केला आहे. चिराग पासवान यांनी वारंवार फक्त आश्वासन दिलं, मात्र मदत केली नाही, असे तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.



    संबंधित तरुणीने तीन महिन्यांपूर्वी दिल्ली पोलिसांकडून प्रिन्स राज यांच्याविरोधात तक्रार दिली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. तर प्रिन्स राज यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये युवतीविरोधात ब्लॅकमेलिंग आणि एक्सटॉर्शनची तक्रार दाखल केली होती.

    प्रिन्स राज हे लोजपचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे छोटे बंधू दिवंगत रामचंद्र पासवान यांचे चिरंजीव आहेत. लोक जनशक्ती पार्टी चिराग गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांचे ते चुलत भाऊ आहेत. त्याचबरोबर मोदींच्या मंत्रिमंडळात नुकताच सहभाग झालेले पशुपती पारस यांचे ते भाचे आहेत.

    संबंधित तरुणीकडून जून 2021 मध्ये कनॉट प्लेस पोलिस ठाण्यात तीन पानांची लिखित तक्रार केली होती. एफआयआर दाखल करण्यास उशीर होत असल्यानं तरुणी कोर्टात गेल्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    खासदार प्रिन्स राज यांनीही तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत त्यांनी संबंधित तरुणी आणि तिच्या साथीदारांवर ब्लॅकमेलिंग आणि एक्सटॉर्शनचा आरोप केला आहे. प्रिन्स यांनी लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

    Lok Janshakti MP Prince Raj is accused of rape, Chirag Paswan’s cousin

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य