• Download App
    बिहारमध्ये 15 मे पर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची ट्विटरवरून माहिती । Lockdown in Bihar till May 15, Information of Chief Minister Nitish Kumar on Twitter

    बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे प्रशासनाला निर्देश

    Lockdown in Bihar : बिहारमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नितीश सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विट करून माहिती दिली. तसेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समूहाला विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी करण्यासही सांगितले आहे. Lockdown in Bihar till May 15, Information of Chief Minister Nitish Kumar on Twitter


    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नितीश सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विट करून माहिती दिली. तसेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन समूहाला विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी करण्यासही सांगितले आहे.

    सोमवारी पाटणा उच्च न्यायालयाने कोरोना संसर्गाची वाढ आणि उपचारांबाबत कठोर भूमिका घेतली. कोर्टाने अॅडव्होकेट जनरल यांनी राज्य सरकारशी बोलून मंगळवारी 4 मे रोजी राज्यात लॉकडाऊन लागणार की नाही, हे सांगण्याचे निर्देश दिले. तसेच हा निर्णय घेतला नाही तर उच्च न्यायालय कठोर निर्णय घेऊ शकते, असाही इशारा दिला होता. कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाने हा प्रश्न विचारला होता.

    उच्च न्यायालयाने म्हटले की, आदेशानंतरही कोरोना रुग्णांसाठी उपचाराच्या सुविधा वाढविण्यात आल्या नाहीत. राज्यातील रुग्णालयांमध्ये अखंडित ऑक्सिजन पुरवठ्यासाठी कोणतीही ठोस कृती योजना नाही. केंद्राच्या कोट्यातून मिळत असलेल्या दिवसाला 194 टनाऐवजी केवळ 160 टन ऑक्सिजन उचलला जात आहे. कोरोनाच्या विस्फोटाचा सामना करण्यासाठी राज्यात कोणतीही सल्लागार समिती गठित झालेली नाही, वॉर रूमही बनलेले नाही.

    सोमवारी, बिहारमध्ये कोरोनामुळे 174 जणांचा मृत्यू झाला. पाटणा येथे 42, बिहारमधील इतर जिल्ह्यात 132 जणांचा मृत्यू झाला. तथापि, आरोग्य विभागाच्या मते, राज्यात 82 जणांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. मगध, भोजपूर आणि सारणमध्ये कोरोनामधून 59 जणांना आपला जीव गमवावा लागला. दररोजची रुग्णसंख्या व मृत्यूंची संख्या वाढत असल्याने राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

    Lockdown in Bihar till May 15, Information of Chief Minister Nitish Kumar on Twitter

    महत्त्वाची बातमी

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक