विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने राज्यव्यापी लॉकडाउनची मुदत १७ मेपर्यंत वाढविली आहे. सध्या लागू असलेल्या लॉकडाउनचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने संसर्गवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आणखी काही काळ लॉकडाउन आवश्याक असल्याचे राज्य सरकारने सांगितले. Lockdown extends in UP
लॉकडाउनचे सकारात्मक परिणाम दिसून हेत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास याचा फायदा होत आहे. नवीन बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आणखी फायदा होण्यासाठी १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे,’ असे राज्य सरकारने लागू केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
उत्तर भारतासाठी मुंबई, पुण्याहून विशेष रेल्वेगाड्या धावणार
या कालावधीत बहुतांशी व्यवहार बंद राहणार असले तरी अत्यावश्यहक सेवा, लसीकरण आणि औद्योगिक कामकाज सुरु राहणार आहे. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २० मेपर्यंत सुटी जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात ऑनलाइन वर्गही बंद असतील.
आधीच्या नियोजनानुसार उद्या (ता. १०) सकाळी लॉकडाउनची मुदत संपणार होती. आता, १७ तारखेला सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्य क आणि काही निवडक सेवा वगळता राज्यातील सर्व व्यवहार बंद असतील.
Lockdown extends in UP
महत्त्वाच्या बातम्या
- स्वबळाचा नारा देत नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीला कानपिचक्या
- कोरोना व्हायरस चीनचे जैवीक अस्त्र, तिसऱ्या महायुध्दाची करतोय तयारी
- निर्मला सीतारामन यांनी ममता बॅनर्जींना समजावून सांगितले गणित, कर रद्द केल्यास उलट औषधे, वैद्यकीय उपकरणे होतील महाग
- महाराष्ट्राची अवस्था पाहता पंतप्रधान कौतुक करतील याची सुतराम शक्यता नाही, मुख्यमंत्री कार्यालयाच्या दाव्यावर भाजपाचा हल्लाबोल