• Download App
    उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशात लॉकडाउनमध्ये पुन्हा वाढ, कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकार हतबल |lockdown extended in UP and HP

    उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशात लॉकडाउनमध्ये पुन्हा वाढ, कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकार हतबल

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहून उत्तर प्रदेश सरकारने राज्यात दहा मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश सरकारने राज्यात ७ मे ते १६ मे पर्यांत लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.lockdown extended in UP and HP

    योगी आदित्यनाथ सरकारकडून दर दोन दिवसाला लॉकडाउनचा कालावधी वाढवला जात आहे. लॉकडाउनच्या घोषणेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी सरकारकडून दीर्घकाळासाठी घोषणा केली जात नसल्याचे सूत्राने म्हटले आहे.



    उत्तर प्रदेश सरकारने सहा मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून अंशत: कोरोना संचारबंदी लागू केली होती. पण विकएंड लॉकडाउन शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात होता.

    परंतु विकएंड लॉकडाउनचे नियम सहा मेपर्यंत वाढवण्यात आले. आता त्याला दहा मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.हरियानात मोठ्या प्रमाणात नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.

    वाढत्या रुग्णांमुळे सरकार चिंतेत आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या विरोधात सरकार सक्रिय झाले आहे. गरज असल्यास नागरिकांना पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

    स्थानिक पातळीवर उपायुक्तांकडून पास दिले जातील आणि त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. पासविना घराबाहेर आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे.

    lockdown extended in UP and HP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट