• Download App
    सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत लोकल प्रवासाची मुभा|local journy will allow for CET students

    सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत लोकल प्रवासाची मुभा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू झालेल्या सीईटी या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी मुंबई महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.local journy will allow for CET students

    यासाठीचे आदेश राज्य आपत्ती व्यवस्थापनने जारी केले असून त्यासाठीच्या सूचना विभागाला दिल्या आहेत.लोकल प्रवासासाठी विद्यार्थ्यांना आपले सीईटी परीक्षेचे हॉल तिकीट दाखवून त्या त्या दिवसाच्या प्रवासाचे तिकीट घेता मिळणार आहे.



    राज्यात विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून या परीक्षा १० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. यादरम्यान विद्यार्थांना लोकल प्रवासाची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाने आदेश जारी केले आहेत.

    local journy will allow for CET students

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही