राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला गौरव ; पंतप्रधान मोदीही होते उपस्थित
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केला. यावेळी मोदीही उपस्थित होते. मोदींशिवाय उपराष्ट्रपती जगदीप धनाड, व्यंकय्या नायडूही उपस्थित होते.LK Advani was awarded ‘Bharat Ratna’ at home
यापूर्वी शनिवारी (30 मार्च) राष्ट्रपती भवनात चार व्यक्तिमत्त्वांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. या चार व्यक्तिमत्त्वांमध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा समावेश होता.
नरसिंह राव यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी, कर्पूरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी राष्ट्रपतींकडून हा सन्मान स्वीकारला.
LK Advani was awarded ‘Bharat Ratna’ at home
महत्वाच्या बातम्या
- INDI आघाडीला लागला नव्या “जेपींचा” शोध, काँग्रेसची मात्र त्यांच्या मागे जुनीच फरकट!!
- केजरीवालांच्या अटकेवर उपराष्ट्रपती म्हणाले- न्यायपालिकेची ताकद कायम; स्वत:ला कायद्याच्या वर समजणाऱ्यांच्या मागे आता कायदा लागला
- अमेरिकेने म्हटले- पाकिस्तानला पाठिंबा देत राहू; बायडेन यांचे पंतप्रधान शाहबाज यांना पत्र
- मंत्री कैलाश गेहलोत ED कार्यालयात; मद्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठवले होते समन्स