विशेष प्रतिनिधी
कोलकता :मृत व्यक्तीचा देह आणायला गेल्यानंतर संबंधित व्यक्ती चक्क कॉटवर बसलेला दिसला तर तुमची बोबडीट वळेल. पण असा प्रकार प. बंगालमध्ये घडला आहे.Live person get death certificate
मृत्युचा दाखला जारी करण्यात आल्यानंतर कर्मचारी मृतदेह आणायला रुग्णालयात गेला तर रुग्ण खाटेवर बसला असल्याचे त्यांना आढळून आले. कल्याणी येथील नेताजी सुभाष कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला.
हिजुली येथील एका २६ वर्षीय तरुणाला कोरोना संसर्गाचे निदान झाल्यामुळे कल्याणीत हलविण्यात आले. त्याच्यावर गेले चार दिवस उपचार सुरु होते. त्याचे निधन झाल्याचा संदेश शुक्रवारी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने कुटुंबीयांना पाठविला. त्यांना शनिवारी मृत्युचा दाखला देण्यात आला.
स्मशानभूमीचे कर्मचारी रुग्णालयात गेल्यानंतर हा तरुण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. मृत्यूच्या प्रमाणपत्रावर त्याच्या वडीलांचे निधन झाल्याचाही उल्लेख होता, मात्र प्रत्यक्षात ते हयात आहेत.
या प्रकारानंतर कुटुंबीयांनी त्या तरुणाला दुसऱ्या रुग्णालयात हलविले. याप्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही, तसेच पूर्ण माहिती घेऊनच प्रतिक्रिया देऊ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
Live person get death certificate
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपाला त्याच्या बुथवर मताधिक्य मिळाले हाच अपराध, आज झाडाला लटकवलेला मृतदेह सापडला
- राजधानी दिल्लीत पुन्हा लॉकडाउनमध्ये वाढ, परिस्थीतीत मात्र वेगाने सुधारणा
- धमक असेल मलाही अटक करून दाखवा, राहुल गांधी यांचे केंद्र सरकारला आव्हान
- तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी योगी आदित्यनाथ यांची तयारी सुरु, सर्व जिल्ह्यांत मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड
- गाझापट्टीतील संघर्ष आणखी पेटला, इस्राईलच्या हवाई हल्ल्यांमध्ये २३ ठार