विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Jaishankar पंतप्रधान नरेंद्र मोदी -अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान २२एप्रिल ते जून १६ दरम्यान एकही फोन कॉल झालेला नव्हता. विरोधकांनी हे कान उघडे ठेवून ऐकावे असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहे.Jaishankar
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी राज्यसभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना स्पष्ट केले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून ते १६ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एकही फोन कॉल झालेला नाही. जयशंकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की भारत आणि पाकिस्तानमधील कोणत्याही विषयात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप होणार नाही, आणि हे सर्व मुद्दे द्विपक्षीय चर्चेतूनच हाताळले जातील.Jaishankar
जयशंकर म्हणाले, ऑपरेशन सिंदूर सुरू झाले, तेव्हा अनेक देशांनी संपर्क साधला की परिस्थिती किती गंभीर आहे आणि ही कारवाई किती दिवस चालेल. आम्ही सर्व देशांना सांगितले की, भारत कोणत्याही मध्यस्थीला तयार नाही.जर पाकिस्तानला संघर्षविराम हवा असेल, तर त्यांना त्यांच्या डीजीएमओच्या माध्यमातून अधिकृत विनंती करावी लागेल.
परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा उल्लेख करत सांगितले जयशंकर म्हणाले की, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांनी ९ मे रोजी भारताला फोन करून पाकिस्तानकडून मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता. त्यावर मोदींनी उत्तर दिलं की, “हम गोली का जवाब गोले से देंगे”.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, “हल्ल्यात निष्पाप नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर मारले गेले, धर्म विचारून हत्या करण्यात आली आणि जम्मू-कश्मीरच्या स्थैर्य व आर्थिक पुनरुत्थानावर हल्ला करण्याचा उद्देश होता.”
Listen with open ears, there was no phone call between Modi and Trump, S. Jaishankar tells the opposition
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे संसदेतील संपूर्ण भाषण; काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले- इतकी चर्चा करा की शत्रू घाबरेल!
- जगातल्या कुठल्याही नेत्याने Operation Sindoor थांबवायला सांगितले नाही; डोनाल्ड ट्रम्पच्या 25 दाव्यांना मोदींचा एकच फटका
- Bihar SIR : बिहारमध्ये SIR वर तूर्त बंदी नाही; SCने ECला विचारले- आधार कार्ड व मतदार ओळखपत्र का समाविष्ट करत नाही?
- Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, थरूर म्हणाले – मौन व्रत; संसदेत काँग्रेसच्या विचारसरणीवर बोलण्यास नकार दिल्याची चर्चा