विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दारू घोटाळ्यातले आरोपी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आज नौटंकी केली. क्रांतिवीर हुतात्मा भगतसिंग यांच्याशी स्वतःशी तुलना करून त्यांची पुन्हा तुरुंग वारी सुरू झाली. Liquor scam accused arvind kejriwal compared himself with great revolutionary bhagat Singh
दिल्लीच्या दारू घोटाळ्यातले मुख्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 25 दिवसांचा जामीन देऊ त्यांची सुटका केली होती. त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने त्यांना 2 जून 2024 रोजी पुन्हा तुरुंग प्रशासनाकडे शरणागती करण्याचे आदेश दिले होते अरविंद केजरीवालांनी सुप्रीम कोर्टापासून वेगवेगळ्या कोर्टांमध्ये आपल्या जामिनाची मुदत वाढविण्यासाठी अर्ज करून पाहिले. परंतु सगळ्या कोर्टांनी त्यांचे अर्ज फेटाळून लावले त्यामुळे आजच पुन्हा तुरुंग वारी करण्याची वेळ केजरीवाल यांच्यावर आली.
आता तुरुंगवारी अपरिहार्य आहे, हे पाहून अरविंद केजरीवाल यांनी आज दिवसभर बरीच राजकीय नौटंकी केली. ते राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीच्या दर्शनासाठी जाऊन आले. त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले.
अरविंद केजरीवाल म्हणाले :
भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिवीर भगतसिंग तुरुंगात गेले, नंतर फाशी गेले. मी देखील भगतसिंगांचा चेला आहे. देशाला तानाशाही पासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जाईन. देशातली तानाशाही राजवट माझ्याशी तुरुंगात कशी वागेल हे मला माहिती नाही. भगतसिंग देशासाठी फाशी गेले. मी पण देश वाचवण्यासाठी फाशी जायला तयार आहे.
अरविंद केजरीवाल यांनी स्वतःची तुलना क्रांतिवीर भगतसिंग यांच्याशी केली असली, तरी प्रत्यक्षात भगतसिंगांना झालेली फाशी ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिल्याबद्दल होती. इंग्रजांना भगतसिंगांचे क्रांतिकार्य सहन होत नसल्यामुळे त्यांनी भगतसिंग यांना फाशी दिली. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुठल्याही प्रकारे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला नाही. उलट दिल्लीतील दारू विक्रेते आणि देशातले दारू पुरवठादार यांना अनुकूल ठरेल असे दारू धोरण आखून दिल्ली आणि देशातल्या दारूवाल्यांकडून अरविंद केजरीवालांनी पैसा घेतला. तो पैसा त्यांनी गोवा निवडणुकीत वापरला त्यामुळे संपूर्ण आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्याच विरुद्ध थेट सुप्रीम कोर्टापर्यंत खटला चालला. सुप्रीम कोर्टाने त्यांना लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी 25 दिवसांसाठी जामीन दिला होता. त्या जामीनाची मुदत आज संपली. त्यामुळे केजरीवाल यांना पुन्हा तिहार तुरुंगात दाखल व्हावे लागले.
पण त्यापूर्वी त्यांनी राजकीय नौटंकी करून राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या समर्थकांना संबोधित करताना स्वतःची तुलना क्रांतिवीर भगतसिंग यांच्याशी केली. पण हे सगळे केले म्हणून केजरीवालांची नौटंकी देशाच्या जनतेपासून लपून राहिली असे घडू शकले नाही.