मद्य धोरण घोटाळ्यात प्रदीर्घ चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाची मोठी कारवाई!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनाल अटक केली आहे. Liquor Policy Scam Aam Aadmi Party MP Sanjay Singh arrested by ED
मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आज ईडीने आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापा टाकला होता. ईडी मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये संजय सिंह यांचेही नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने संजय सिंह यांची जवळपास दहा तास चौकशी केली होती. सध्या संजय सिंह त्यांच्या घरी हजर आहेत. चौकशीनंतर ईडीने संजय सिंह यांना अटक केली आहे. यानंतर निमलष्करी दलाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता ईडीचे अधिकारी संजय सिंह यांना ताब्यात घेणार आहेत. त्याचवेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही संजय सिंह यांच्या घराबाहेर जमायला लागले आहेत.
यापूर्वी 24 मे रोजी याच प्रकरणात ईडीने संजय सिंह यांच्या जवळच्या नातेवाईकांवर छापे टाकले होते. तेव्हा ते म्हणाले होते की” मी ईडीचा खोटा तपास संपूर्ण देशासमोर उघड केला. याबाबत ईडीने चूक मान्य केली. माझ्याकडे काहीही सापडले नाही, तेव्हा आज ईडीने माझे सहकारी अजित त्यागी आणि सर्वेश मिश्रा यांच्या घरांवर छापे टाकले. सर्वेश यांचे वडील कर्करोगाने त्रस्त आहेत. हा गुन्ह्याचा कळस आहे. कितीही गुन्हा केला तरी लढा सुरूच राहणार आहे.”
Liquor Policy Scam Aam Aadmi Party MP Sanjay Singh arrested by ED
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांचे आणखी एक नॅरेटिव्ह फडणवीसांकडून उद्ध्वस्त; राष्ट्रपती शासन उठविण्यात नव्हे; लावण्यातच पवारांचा हात!!
- VIDEO : ‘स्वदेस’फेम बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये भीषण अपघात!
- शरदनिष्ठ राष्ट्रवादी उद्धव शिवसेना वळणावर; पक्षपाताचा आरोप केला निवडणूक आयोगावर!!
- बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, याचिकेवर 6 ऑक्टोबरला सुनावणी