वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वडिलांनी भूषविलेले पद आता मुलगाही भूषवणार आहे. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आता आपले वडील यशवंत विष्णू चंद्रचूड यांच्या पावलावर पाऊल टाकणार आहेत. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश असणार आहेत.Like father like son : justice D. Y. Chandrachud to be the 50th chief justice of india, as his father justice Y. V. Chandrachud had been longest serving chief justice of India
सरन्यायाधीश यू. यू लळीत यांनी आज, मंगळवारी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचे नाव उत्तराधिकारी म्हणून सरकारला पाठवले आहे. न्यायमूर्ती यू. यू. लळीत हे पुढच्या महिन्यात 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून त्याच्या नावाची शिफारस केली आहे.
सरन्यायाधीश यू यू लळीत यांनी मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना जजेस लाऊंजमध्ये आमंत्रित केले आहे. यामध्ये त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती मिळते आहे. तर केंद्र सरकारच्या वतीने कायदा मंत्रालयाने सरन्यायाधीश यू यू लळीत यांना त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची शिफारस पाठवण्याची विनंती केली होती. जेष्ठता यादीनुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड हे सध्याचे मुख्य न्यायाधीश लळीत यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ आहेत. म्हणून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांनी 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यांचा कार्यकाल केवळ 74 दिवसांचा असून ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवत उत्तराधिकाऱ्याचे नाव पाठवण्याबाबत कळवले आहे. ज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हेच ज्येष्ठ असल्याने त्यांच्याच नावाची शिफारस होणार असल्याचे मानले जात आहे. त्यांचा कार्यकाल 9 नोव्हेंबर 2022 पासून 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत दोन वर्षांचा असणार आहे.
न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देखील भारताचे सरन्यायाधीश होते. दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांनी सरन्यायाधीश पद भूषविले होते. 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 असे तब्बल साडेआठ वर्षे ते सरन्यायाधीश होते. भारताच्या आत्तापर्यंतच्या सरन्यायाधीशांमध्ये सर्वाधिक काल सरन्यायाधीश पद भूषविलेले ते पहिले सरन्यायाधीश ठरले होते
Like father like son : justice D. Y. Chandrachud to be the 50th chief justice of india, as his father justice Y. V. Chandrachud had been longest serving chief justice of India
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा : खासगी रुग्णालयात अँजिओग्राफीस परवानगी, जसलोकमध्ये उपचार
- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू : शिवसेनेच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल
- Mahakal Lok Photos : महाकाल लोकच्या कॉरिडॉरमध्ये हजारो वर्षांचा इतिहास, कारंजे आणि 50 हून अधिक भित्तीचित्रे, अशी आहे वैशिष्ट्ये