प्रतिनिधी
मुंबई : वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा जानेवारी, २०१८ अस्तित्वात आला आहे. या उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना घेणे, ऑक्टोबर २०२२ बंधनकारक करण्यात आले आहे; असे, अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (औषधे) जी.बी.ब्याळे यांनी कळविले आहे. Licensing of medical devices Which devices fall under the category of drugs? Read in detail
रुग्णांच्या उपचारासाठी व रोगनिदानासाठी वैद्यकीय उपकरणांचा वापर केला जातो. यापूर्वी ३७ वैद्यकीय उपकरणांचे नियमन केले जात होते. आता नव्या कायद्यानुसार सुमारे २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित केले जाणार आहे. वैद्यकीय उपकरणे अधिनियम (Medical Device Rules) २०१७ नुसार १ ऑक्टोबर २०२२ पासून वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना असणे आवश्यक आहे. (परवाना घेणे सक्तीचे करण्यात आले आहे).
वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांकाही सोबत असतील
नेब्युलायझर, डिजिटल थर्मामिटर, रक्तदाबाचे मॉनिटर, ग्लुकोमिटर या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांना औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या अंतर्गत औषधे या वर्गवारीत गणले जाणार आहे.
यापूर्वी फक्त कार्डियाक स्टेंट, हार्ट व्हॉल्व्ह, ऑर्थोपेडिक्स इम्प्लांट, यासारख्या वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी उत्पादन परवाने दिली जात होते. याव्यतिरिक्त इतर काही वैद्यकीय उपकरणांची (जसे ब्लड प्रेशर मशीन, एमआरआय आणि एक्स-रे मशीन) मोठ्या प्रमाणात विनापरवाना आणि नियंत्रणाशिवाय उत्पादन विक्री होत होती.
मात्र २०१७ च्या नव्या नियमानुसार २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित करण्यात येणार आहे. कमी जोखीम आणि जास्त जोखमीच्या उपकरणांना अ आणि ब श्रेणीत ठेवले आहे. यामध्ये १ हजार ६४ प्रकारची उपकरणे आहेत. त्यांना १ ऑक्टोबरपर्यंत परवाने घ्यावे लागतील, असे अन्न व औषध विभागाने कळविले आहे.
Licensing of medical devices Which devices fall under the category of drugs? Read in detail
महत्वाच्या बातम्या
- ABP C Voter सर्वेक्षण : सावध ऐका पुढल्या हाका…, पण काँग्रेससाठी
- Gujarat ABP C-Voter सर्वेक्षण: गुजरातेत भाजप जिंकणार ही बातमी नव्हे; आप काँग्रेसला मागे टाकणार ही बातमी आहे
- द फोकस एक्सप्लेनर : दागेस्तानमध्ये रशियाच्या विरोधात मुस्लिम का उतरले रस्त्यावर, पुतीन यांच्या वक्तव्याने पडली ठिणगी, वाचा सविस्तर…