• Download App
    महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून जनतेला त्रासातून मुक्त करा: भाजप अध्यक्ष नड्डा यांचे भाजप कार्यकर्त्याना आवाहन । Liberate the people by overthrowing the Mahavikas Aghadi government; Said BJP President J. P. Nadda's

    महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून जनतेला त्रासातून मुक्त करा: भाजप अध्यक्ष नड्डा यांचे भाजप कार्यकर्त्याना आवाहन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या त्रासापासून जनतेला मुक्तता करा, असे आवाहन भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कार्यकर्त्याना केले आहे. Liberate the people by overthrowing the Mahavikas Aghadi government; Said BJP President J. P. Nadda’s

    भारतीय जनता पक्षाच्या राजधानीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डा बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर महावसुली आणि भ्रष्टाचारात सामील आहे. असे सरकार उखडून टाकून जनतेची सुटका कार्यकर्त्यानी करावी. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सेवा आणि लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा मंत्र दिला. भाजपामध्ये परिवारवाद नाही.



    सेवा, संकल्प आणि समर्पण यामुळेच हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे, असे मत मांडून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  मोदी म्हणाले की, सामान्य नागरिकांशी सतत चांगला संपर्क असल्यानेच भाजप आज केंद्रात सर्वोच्च स्थानी आहे. पंतप्रधान नमो अॅपवरील कमल पुष्प फीचरला उल्लेख करून मोदी म्हणाले  की, या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आणि निस्वार्थ भावनेने केलेले सेवाकार्य लोकांसमोर आणले पाहिजे.

    Liberate the people by overthrowing the Mahavikas Aghadi government; Said BJP President J. P. Nadda’s

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Madhuri Elephant : कोल्हापूरच्या माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाचा आक्षेप; वनतारासारखी सुविधा महाराष्ट्रात नसल्याचा दावा

    Rahul Gandhi : निवडणूक आयोगाने म्हणाले- दावे खरे, तर राहुल यांनी सही करावी; अन्यथा देशाची माफी मागावी

    भारतीय हवाई दल प्रमुखांनी ट्रम्पच्या जखमेवर मीठ चोळले; भारताने पाकिस्तानची 5 विमाने पाडल्याचे सांगितले!!