• Download App
    Nitin Nabin सामना म्हणतो, बिनचेहऱ्याचे, बिनपाठकण्याचे लोक भाजपच्या राजकारणाचे बळ!!, पण मोठ्या चेहऱ्याच्या आणि बळकट पाठकण्याच्या नेत्यांनी दिल्लीत काय दिवे लावले??

    सामना म्हणतो, बिनचेहऱ्याचे, बिनपाठकण्याचे लोक भाजपच्या राजकारणाचे बळ!!, पण मोठ्या चेहऱ्याच्या आणि बळकट पाठकण्याच्या नेत्यांनी दिल्लीत काय दिवे लावले??

    नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे देशातल्या लिबरल लोकांच्या वर्तुळाला पहिला धक्का बसला. नंतर त्यांच्या बुडाला आग लागली. त्यामुळे वाटेल तसे बरळून त्यांनी आपला राजकीय वैचारिक कंडू शमवून घेतला. Nitin Nabin

    बिनपाठकण्याचे आणि बिनचेहऱ्याचे लोक सध्या भाजपचा राजकारणाचे बळ झालेत. संघाला नको असताना नितीन नवीन सिन्हा यांच्यासारखे होयबांसारखे नेते मोदी – शाहांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नेमलेत. त्यांच्याकडून काही होणार नाही. मोदी सरकारच्या धोरणांना पाठिंबा देणे, त्यांचा उदो उदो करणे, याखेरीज नितीन नवीन सिन्हा दुसरे काही करणार नाहीत, असा दावा सामनाने अग्रलेखातून केला.

    तशाच स्वरूपाची टीका स्वरूपाची टीका बाकीच्या लिबरल लोकांनी वेगवेगळे व्हिडिओ करून किंवा लेख लिहून केली. मोदी – शाहांनी भाजपमध्ये काँग्रेस संस्कृती आणली. इंदिरा गांधींनी ज्याप्रमाणे देवकांत बरुआ यांना काँग्रेसचे अध्यक्ष नेमले होते, त्या पद्धतीनेच मोदी शाहांनी नितीन नवीन सिन्हा यांना अध्यक्ष नेमले, असा सगळ्यांचा सूर राहिला.

    – मोदी – शाहांवर राग

    पण सामना आणि बाकीचे लिबरल लोक यांच्या टीकेचा आणि आगपाखडीचा सगळा रोख आपले अंदाज चुकलेच कसे??, आपण चर्चेत आणलेली नावे मोदी – शाह यांनी गुंडाळून टाकलीच कशी??, याच्या रागावर होता. सगळ्या देशाचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण आपण पेपरमधून चालवतो आणि हे मोदी – शाह आपल्याला विचारत नाहीत. आपले अंदाज विचारात घेत नाहीत. सगळे अंदाज चुकवून टाकतात, हा सामना आणि बाकीच्या लिबरल लोकांचा त्यांच्यावर राग आहे. तो त्यांनी नितीन नवीन सिन्हा यांच्या नियुक्तीचे विश्लेषण करताना ओकून टाकला.

    – मोठ्या चेहऱ्याच्या नेत्यांनी काय दिवे लावले??

    पण त्या पलीकडे जाऊन सामनातील एका महत्त्वाच्या वक्तव्याचा समाचार घ्यायचा म्हटले, तर नितीन नवीन सिन्हा हे बिनचेहऱ्याचे आणि बिनपाठकण्याचे नेते असतील आणि त्यांच्याकडून काही होणार नसेल, तर महाराष्ट्रातले मोठ्या चेहऱ्याचे आणि बळकट पाठ करण्याचे दोन नेते किंवा आणखी काही नेते दिल्लीत होते, तर त्यांनी काय दिवे लावले??, हा सवाल विचारावा लागेल. सामनाचे सध्याचे “दैवत” शरद पवार हे दिल्लीत अडीच वर्षे संरक्षण मंत्री आणि 10 वर्षे कृषी मंत्री होते. त्याआधी या सामन्याच्या दैवताने थेट पंतप्रधान पदाला गवसणी घातली होती, पण त्यात ते हरले आणि मुकाट्याने कृषिमंत्री पद हातात घेऊन गप्प बसले. आपले काड्या घालण्याचे आणि जुगाडू राजकारण करत राहिले. दिल्लीतल्या कुठल्याही नेतृत्वाला आव्हान देण्याची त्यांची क्षमताच उरली नाही.



    त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण हे देखील असेच मोठ्या चेहऱ्याचे आणि तथाकथित बळकट पाठकण्याचे नेते होते. त्यांना सुद्धा इंदिरा गांधींनी भरपूर महत्त्वाची खाती देऊन मंत्रिपदावर बसवून ठेवले होते. पण इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची, इंदिरा गांधींवर मात करण्याची या मोठ्या चेहऱ्याच्या आणि बळकट पाठकण्याच्या नेत्याची सुद्धा क्षमता आणि हिंमत नव्हती. ते इंदिरा गांधींसमोर सरपटी राजकारण करत राहिले होते. यशवंतरावांना शेवटी इंदिरा गांधींसमोर त्यांना शरणागती पत्करून काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला होता. त्यासाठी याचना करावी लागली होती.

    दिल्लीत राहून राजकारण करणाऱ्या बाकीच्या मराठी नेत्यांचे सुद्धा फारसे काही वेगळे चित्र नाही. त्यांनी सुद्धा दिल्लीतली फार मोठी संधी येऊन दिल्लीतल्या कुठल्या नेतृत्वावर मात केल्याचे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर दिल्लीत मोठा झेंडा गाडल्याचे एकही उदाहरण नाही. मग त्यांच्यावर कुणीही कितीही पुस्तके लिहोत किंवा त्यांचे गोडवे गावोत, त्याने राजकीय वस्तुस्थितीत फरक पडणार नाही.

    – मोदींचे राजकारण On His Terms

    भाजप, मोदी – शाह आणि नितीन नवीन सिन्हा यांच्याबाबतीत निदान असला प्रकार तरी नाही. कारण मोदी आणि शाह हे सुरुवातीला असेच बिनचेहऱ्याचे नेते होते, पण त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आणि संघटनेच्या बळावर स्वतःचे मोठे चेहरे निर्माण केले आणि त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी दिल्लीत तिथल्या प्रस्थापित नेतृत्वावर मात करून झेंडा गाडला. आता ते स्वबळावर आणि “स्व”तंत्रावर दिल्लीतले राजकारण हाकत आहेत. मोदी आणि शाह यांनी आपले आत्मचरित्र अजून लिहिलेले नाही किंवा त्याचे नाव सुद्धा On My Terms असे ठेवलेले नाही, पण ते न लिहिता सुद्धा मोदी आणि शाह On Their Terms च राजकारण करत आहेत आणि त्यासाठी स्वतःच्या कर्तृत्वाने संघाची अनुमती मिळवत आहेत .

    – कर्तृत्व सिद्ध केले तर ठीकच

    नितीन नवीन सिन्हांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ते बिहार मधले प्रादेशिक पातळीचे नेते होते, ही वस्तुस्थिती त्यांनी सुद्धा नाकारलेली नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष होणे हा त्यांच्यासाठी सन्मान असल्याचे ते म्हणाले होते. पण त्या सन्मानाच्या पलीकडे जाऊन ती मोठी जबाबदारी आहे. ती त्यांनी ती मोदी – शाह यांनी त्यांना दिली. त्यांनी ती स्वीकारली. आता त्या जबाबदारीच्या पदावर बसून त्यांना स्वतःचे राजकीय कर्तृत्व सिद्ध करायचे आहे. ते त्यांनी सिद्ध केले, तर ते भाजपच्या आणि देशाच्या राजकारणात टिकून पुढे जातील आणि सिद्ध नाही करू शकले, तर ते आहे त्या ठिकाणी स्थिर राहतील किंवा मागे पडतील. त्याने भाजपमध्ये किंवा देशाच्या राजकारणात फारसा फरक पडणार नाही. भाजप कुठल्या एका नेत्याच्या भोवती पिंगा घालत बसणार नाही. एकाच घराणेशाहीतल्या नेत्यावर वर्षानुवर्षे प्रयोग करत बसणार नाही. त्यामुळे सामना आणि लिबरल लोकांनी कितीही आगपाखड केली आणि त्यांच्या बुडाला आग लागली असली, तरी त्याने मोदी – शाह आणि आता नितीन नवीन सिन्हा यांना कुठल्या केसाइतका देखील काही फरक पडणार नाही.

    Liberal people in India “angry” over Nitin Nabin’s appointment

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    MGNREGA : मोदी सरकारच्या जाळ्यात अडकले राहुल + प्रियांका गांधी आणि बाकीचे विरोधक!!

    India Exports China : भारताची चीनला निर्यात 32.83% वाढली; एप्रिल-नोव्हेंबरमध्ये 12.2 अब्ज डॉलर होता; नोव्हेंबरमध्ये व्यापार तूटही कमी झाली

    ममतांकडे ३५ ते ४० लाख बनावट मतदार, काँग्रेसचा आरोप; पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे डिलीट!!