• Download App
    Modi BJP and Mamata TMC मोदी विरुद्ध ममतांच्या संघर्षात कम्युनिस्टांना कंठ फुटला; 14 वर्षांच्या झोपेनंतर विळा हातोडा बाहेर काढला!!

    मोदी विरुद्ध ममतांच्या संघर्षात कम्युनिस्टांना कंठ फुटला; 14 वर्षांच्या झोपेनंतर विळा हातोडा बाहेर काढला!!

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संघर्षात पश्चिम बंगाल मध्ये अखेर कम्युनिस्टांना कंठ फुटला 14 वर्षांच्या झोपेनंतर विळा हातोडा बाहेर काढला!! असे म्हणायची वेळ आता कम्युनिस्टांच्या political activisiom मुळे आली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवाच पश्चिम बंगाल मध्ये जाऊन ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी सरकारच्या राजवटीत हिंदूंचे जीवन धोक्यात आले. मुर्शिदाबाद सारख्या ठिकाणी हिंदूंना हिंसाचार सहन करावा लागला. त्यांना आपल्याच देशात निर्वासिताचे जीवन जगावे लागले. यावरून मोदींनी ममता बॅनर्जी सरकारला धारेवर धरले. शिक्षक भरती घोटाळ्यातला सगळा किस्सा त्यांनी जाहीरपणे सांगितला.

    त्यामुळे ममता बॅनर्जी चिडल्या आणि त्यांनी ऑपरेशन सिंदूर मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना घेरले. दहशतवाद्यांची तुलना मोदींनी पश्चिम बंगालच्या धरतीशी केली. इथल्या लोकांना त्यांनी दहशतवादी म्हटले असा बेछूट आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. त्यामुळे मोदी विरुद्ध ममता असा संघर्ष सगळ्या देशभर पेटला. भाजप आणि तृणमूळ काँग्रेस यांचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. 2026 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष सुरुवातीलाच मोठा पेटून उठला.

    पण 2011 नंतर पश्चिम बंगाल मध्ये शांतपणे झोपी गेलेल्या कम्युनिस्टांना आता अचानक कंठ फुटला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे दोघेही टोकाचे राजकारण करतात. हिंदू आणि मुसलमान यांना एकमेकांशी लढवतात. पश्चिम बंगालची जनता या दोघांच्याही पक्षांना नाकारेल आणि कम्युनिस्टांना पुन्हा राज्यात पाठिंबा देईल, असा दावा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते ए. राजा यांनी केला.

    वास्तविक 2011 पूर्वी कम्युनिस्टांची एकछत्री राजवट पश्चिम बंगाल मध्ये होती. त्या राजवटीविरुद्ध काँग्रेस आणि भाजप या पक्षांची ब्र काढायची हिंमत नव्हती. कारण त्यांची तेवढी ताकद नव्हती. ती हिंमत आणि क्षमता ममता बॅनर्जींनी दाखवली. कम्युनिस्टांचा पराभव करून गेली पंधरा वर्षे पश्चिम बंगाल वर राज्य केले. कम्युनिस्टांचा एकही आमदार निवडून येता कामा नये एवढी मोठी राजकीय झेप ममता बॅनर्जींनी घेतली.

    पण कम्युनिस्टांनी गेल्या पाच वर्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये जमिनी स्तरावर कार्यकर्त्यांची मोठी बांधणी करून राजकीय पेरणी करून ठेवली. 2026 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कम्युनिस्ट पक्षांच्या विळा हातोडा, विळा भाताची लोंबी, सिंह या चिन्हांवर जास्तीत जास्त तरुण उमेदवार देऊन तृणमूळ काँग्रेस आणि भाजप यांच्याशी टक्कर घेण्याचा इरादा कम्युनिस्टांनी दाखवून दिला. म्हणूनच ए. राजा यांनी मोदी आणि ममता या दोघांच्याही पक्षांना आम्ही पर्याय देऊ, असा दावा केला. परंतु, विधानसभा निवडणुकीसाठी अजून एक वर्ष अवकाश आहे. 2026 एप्रिल आणि मे महिन्यात या निवडणुका होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत पश्चिम बंगालच्या गंगा, पद्मा, हुगळी या नद्यांमधून बरेच राजकीय पाणी वाहून जायचे आहे.

    Left front to take on Modi BJP and Mamata TMC in West Bengal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार