विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेना राष्ट्रवादी जनता दल युनायटेड आदी प्रादेशिक पक्षांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा निवृत्तीचा विचार बाजूला असून काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वतः पुढे येऊन विरोधी ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे उद्या बंगलोर मध्ये डिनर डिप्लोमसी करत त्या 23 पक्षांच्या एकजुटीचा प्रयत्न करणार आहेत. Leaving aside the thought of retirement, Sonia herself took the initiative for anti-unity
विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांमध्ये आधीच्या बैठकीत 17 पक्ष सामील झाले होते. बंगलोरच्या बैठकीला 23 पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. स्वतः सोनिया गांधी या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत. बंगलोर मध्ये उद्या 17 आणि 18 जुलै 2023 या दोन दिवशी ऐक्याची बैठक होणार आहे.
सोनिया गांधी स्वतःच पुढाकार घेणार असल्याने काँग्रेसमध्ये राहुल गांधी बॅक सीटवर गेले आहेत, तसेच विरोधी आघाडीचा यूपीए 3 चा प्रयत्न नव्या नावाने सुरू होणार आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालच्या नव्या आघाडीचे नाव कदाचित प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायन्स किंवा पॅट्रिऑटिक डेमोक्रॅटिक अलायन्स असे ठेवण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे विरोधी ऐक्याच्या बैठकीच्या व्यवस्थेची खास जबाबदारी दिली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे कदाचित नव्या आघाडीची निमंत्रक पदाची सूत्रे सोनिया गांधी सोपविण्याची शक्यता आहे.
आपला निवृत्तीचा विचार विसरून मोठी विरोधात स्वतः सोनिया गांधी उतरणार असल्यामुळे विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांना विशेष गांभीर्य आले आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे प्रादेशिक पक्ष फुटले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना स्वतःचे पक्ष टिकवता आले नाहीत या पार्श्वभूमीवर काँग्रेस फुटण्याआधी करण्याच्या दृष्टीने सोनिया गांधी कार्ड ऍक्टिव्ह झाले आहे.
Leaving aside the thought of retirement, Sonia herself took the initiative for anti-unity
महत्वाच्या बातम्या
- शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या संघर्षात काँग्रेसला लाभ; भाजप खालोखाल दुसऱ्या नंबरचा पक्ष!!
- ‘’बिहारसाठी काहीतरी चांगले करा, दुसऱ्यांना दोष देत राहिल्यास …’’ प्रशांत किशोर यांचा तेजस्वी यादवांवर निशाणा!
- नाशिक मध्ये मुलींसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन
- आता लॉटरी पद्धत नाही, तर मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे आणि ड्रीप सिस्टीम; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय