• Download App
    लसीकरणात आघाडी : भारताची चिंता असलेल्या जागतिक माध्यमांनी भारताचे यशही दाखवावे, आनंद महिंद्रा यांनी सुनावले|Leading in Vaccination: India's Concerned Global Media Should Show India's Success also , Says Anand Mahindra

    लसीकरणात आघाडी : भारताची चिंता असलेल्या जागतिक माध्यमांनी भारताचे यशही दाखवावे, आनंद महिंद्रा यांनी सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतातील कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीविषयी वृत्तांकन करणाºया जागतिक माध्यमांनी भारताचे यश देखील दाखवावे असे ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुनावले आहे. महिंद्रा यांनी एक टाईम लॅप्स व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये भारतात झालेल्या लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली आहे.Leading in Vaccination: India’s Concerned Global Media Should Show India’s Success also , Says Anand Mahindra

    आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केलेल्या २८ सेकंदांच्या टाईम लॅप्स व्हिडीओ क्लिपमध्ये १ फेब्रुवारीपासून ११ ऑगस्टपर्यंत भारतात कशा पद्धतीने लसीकरणाचं प्रमाण वाढत गेले याचा आलेख देण्यात आला आहे.

    त्यासोबतच, जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरण कसे वाढत गेलं, हे देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आत्ता जगात सर्वाधिक लसीकरण भारतात झाल्याचं या क्लिपमधील आलेखांवरून दिसत आहे.या व्हिडीओ क्लिपसोबत आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या संदेशामध्ये जागतिक माध्यमांना कानपिचक्या दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की हे थक्क करून सोडणारं यश आहे.

    आपल्या लोकसंख्येमुळे टक्केवारीच्या बाबतीत हे प्रमाण कमी दिसतंय. पण तरीही, जागतिक माध्यमांनी भारतानं मिळवलेलं हे प्रचंड यश दाखवायला हवं. जेवढे कष्ट आपलं अपयश दाखवण्यासाठी ते घेतात, तेवढेच कष्ट घेऊन त्यांनी हे यश देखील दाखवावे.

    Leading in Vaccination: India’s Concerned Global Media Should Show India’s Success also , Says Anand Mahindra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!