• Download App
    अकाली दलाच्या हटवादीपणाला नेते कंटाळले, कृषि विधेयकावरील भूमिकेवरून नाराज पाच नेत्यांनी भाजपामध्ये केला प्रवेश|Leaders fed up with Akali Dal's bigotry, disgruntled over position on agriculture bill

    अकाली दलाच्या हटवादीपणाला नेते कंटाळले, कृषि विधेयकावरील भूमिकेवरून नाराज पाच नेत्यांनी भाजपामध्ये केला प्रवेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील नव्या कृषि कायद्यांबाबत अकाली दलाने घेतलेल्या भूमिकेवरून आता शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांमध्येच नाराजी वाढू लागली आहे. अकाली दलाच्या हटवादीपणाला कंटाळून पाच नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.Leaders fed up with Akali Dal’s bigotry, disgruntled over position on agriculture bill

    अकाली दलाच्या महिला शाखेच्या सदस्या अमनज्योत कौर रामुवालिया, गुरप्रीतसिंग शाहपूर, चांदसिंग चठा, प्रीतमसिंग आणि बलजिंदरसिंग दकोहा यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, भाजपाचे सरचिटणीस तरुण चुघ यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. याशिवाय माजी वृत्तनिवेदक चेतन मोहन जोशी यांनीही भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.



    यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की, अकाली दलाच्या नेत्यांच्या भाजपात दाखल होण्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीत विजयाचा रोख कोणत्या दिशेने आहे, हे लक्षात येते. देशाने नाकारलेले काही पक्ष सत्तेत येण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.भाजपाचा मार्ग स्वीकारलेले नेते राजकीयदृष्ट्या अनुभवी असून, आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रसिद्ध आहेत.

    भाजपाचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम म्हणाले की, पंजाब राज्यातील जनतेला शांतता आणि समाधान हवे आहे. आणि यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आशेने पाहात आहेत. सत्तेसाठी भाजपा हा उत्कृष्ट पर्याय असल्याचेही लोकांना जाणवत आहे.

    राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने कृषि कायद्याच्या मुद्यावर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या अकाली दलाच्या नेत्या हरमिंदरसिंग कौर यांनी राजीनामा दिला होता. मात्र, अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये कृषि कायद्याला विरोधातून संभ्रमावस्था आहे. त्यामुळे अनेकांनी भाजपामध्ये सामील होण्याचा रस्ता पकडला आहे.

    Leaders fed up with Akali Dal’s bigotry, disgruntled over position on agriculture

    bill

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही