• Download App
    सत्येंद्र जैनांचे वजन 28 किलोंनी घटल्याचा वकिलाचा दावा; पण वजन 8 किलोंनी वाढल्याचा जेल प्रशासनाचा खुलासा Lawyer's claim that Satyendra Jain's weight has decreased by 28 kg

    सत्येंद्र जैनांचे वजन 28 किलोंनी घटल्याचा वकिलाचा दावा; पण वजन 8 किलोंनी वाढल्याचा जेल प्रशासनाचा खुलासा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिग प्रकरणात दिल्लीच्या तिहार जेलची हवा खात असलेले अरविंद केजरीवाल सरकार मधले मंत्री सत्येंद्र जैन यांच्या संदर्भात दररोज वेगवेगळे आरोप आणि वेगवेगळे खुलासे होत आहेत. त्यांचा मसाज करून घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली सरकार एक्स्पोज झाले. पण आता त्या पलिकडचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये ते तिहार जेलमध्ये चौरस आहार घेताना दिसत आहेत. Lawyer’s claim that Satyendra Jain’s weight has decreased by 28 kg

    सत्येंद्र जैन यांच्या वकिलांनी जेल प्रशासना विरुद्ध काही आरोप केले होते. सत्येंद्र जैन यांचे वजन तब्बल 28 किलोंनी घटल्याचा दावाही केला होता. पण प्रत्यक्षात सत्तेंद्र जैन यांचे वजन 8 किलोंनी खुलासा जेल प्रशासनाने केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचे जे अंश व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये सत्येंद्र जैन हे चौरस आहार घेताना दिसत आहेत.

    जेल नियमावलीनुसार सत्येंद्र जैन यांना आहार पुरविला जातो. यामध्ये दिवसातून तीन वेळा खाणे आणि औषधे दिली जातात. आजारी कैदी, गर्भवती महिला कैदी आदींना वैद्यकीय सल्ल्यानुसार जेल मधले अथवा बाहेरचे जेवण दिले जाते. खास डाएट दिले जाते. सत्येंद्र जैन यांना देखील जेल नियमानुसारच व्यवस्थित आहार दिला जातो. तो आहार देखील चौरस आहे. त्यामुळे त्यांचे वजन जेलमध्ये 8 किलोंनी वाढल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    Lawyer’s claim that Satyendra Jain’s weight has decreased by 28 kg

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम