दिल्ली दंगलीमध्ये पोलीसांनी मुस्लिमांना लक्ष्य केल्याचा आरोप करणाऱ्या वकीलाला न्यायालयाने चांगलेच खडसावले. हा आरोप तथ्यहिन आणि घृणास्पद असून पोलीसांनी पूर्ण सचोटीने आपले काम केले असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.Lawyer accused of targeting Muslims in Delhi riots, The court ruled that the police had acted with integrity
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली दंगलीमध्ये पोलीसांनी मुस्लिमांना लक्ष्य केल्याचा आरोप करणाऱ्या वकीलाला न्यायालयाने चांगलेच खडसावले. हा आरोप तथ्यहिन आणि घृणास्पद असून पोलीसांनी पूर्ण सचोटीने आपले काम केले असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.Lawyer accused of targeting Muslims in Delhi riots, The court ruled that the police had acted with integrity
अतिरिक्त सत्र न्यायाधीश वीरेंद्र भट यांच्यासमोर दिल्ली दंगलीतील आरोपी आरिफच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. यावेळी वकील मेहमूद प्राचा यांनी पोलीसांनी केवळ मुस्लिमांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगली खरे तर जातीय दंगली नाहीत, असाही युक्तिवाद केला. सीएए विरोधासाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला संपविण्यासाठी काही राजकारण्यांनी निहित स्वाथार्पोटी दंगल घडविल्याचा आरोप केला. प्राचा यांनी युक्तिवाद केला दंगलीनंतर पोलिसांनी केवळ मुस्लिम समाजातील व्यक्तींनाच लक्ष्य केले आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले.
न्यायालयाने प्राचा यांच्या युक्तिवादावर संताप व्यक्त करताना म्हटले की अत्यंत घृणास्पद आणि तिरस्करणीय युक्तिावाद केला आहे. त्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही. केवळ मुस्लिम समुदायावर दंगलीशी संबधित गुन्हे दाखल केल्याचे प्राचा यांचे म्हणणे संपूर्ण दिल्ली पोलीसांना जातीय रंगात रंगवित आहे. त्यांचे विधान केवळ अत्यंत बेजबाबदारच नाही तर स्पष्टपणे खोटे देखील आहे. दंगलीशी संबंधित प्रकरणे हाताळताना दोन्ही समुदायांच्या सदस्यांना आरोपी म्हणून हजर केले गेले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे, हे न्यायालयाला पूर्ण माहित आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, पोलिसांनी आपले काम अत्यंत सचोटीने केलेले दिसते. निश्चितपणे जातीय आधारावर काम केलेले नाही. दंगलीशी संबंधित या प्रकरणांच्या तपासादरम्यान काही त्रुटी राहिल्या असतील, पण त्या त्रुटींमुळेही तपास निष्पक्ष आणि जातीयवादी नसल्याचे किंचितही संकेत मिळत नाही.
Lawyer accused of targeting Muslims in Delhi riots, The court ruled that the police had acted with integrity
महत्त्वाच्या बातम्या
- Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!
- त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार
- चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित
- ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!