• Download App
    सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली जबाबदारी, म्हणाला... Lawrence Bishnois brother claims responsibility for shooting outside Salman Khans house

    सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली जबाबदारी, म्हणाला…

    दाऊद आणि छोटा शकीललच्या नावाचाही केला आहे उल्लेख Lawrence Bishnois brother claims responsibility for shooting outside Salman Khans house

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई सध्या अमेरिकेत आहे. अनमोल बिश्नोईने सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

    तसेच म्हणाला की, सलमान आम्ही हा हल्ला तुला ट्रेलर दाखवण्यासाठी केला आहे. हा आमचा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. त्याने पुढे लिहिले की, आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरुद्धचा निर्णय युद्धातून असेल तर युद्ध ठीक. सलमान खान आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केले आहे. जेणेकरून तुला समजेल आमच्या ताकदीची आणखी परीक्षा घेऊ नको, ही पहिली आणि शेवटची चेतावणी आहे. यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत आणि तू ज्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला देव मानले आहे, त्यांच्या नावाचे दोन कुत्रे आम्ही पाळले आहेत. बाकी फार काही मला बोलायची सवय नाही.

    बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी आहे. रविवारी पहाटे वांद्रे येथील बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चार राऊंड गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी पहाटे 4.50 च्या सुमारास दुचाकीस्वार दोन शूटर्सनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही गोळीबार करणाऱ्यांनी गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

    Lawrence Bishnois brother claims responsibility for shooting outside Salman Khans house

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!