उत्तर प्रदेशची गुंडाराज आणि दंगाराज ही ओळख बदलून योगी आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण केली. यासाठी त्यांना अनेक खतरनाक गुन्हेगारांशी पंगा घ्यावा लागला.Law and order is one of the reason of victory, but for that, Yogi Adityanath has to deal with dangerous criminals.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ – उत्तर प्रदेशची गुंडाराज आणि दंगाराज ही ओळख बदलून योगी आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण केली. यासाठी त्यांना अनेक खतरनाक गुन्हेगारांशी पंगा घ्यावा लागला.
सुमारे दोन दशके गोरखपूरचे खासदार म्हणून कार्यरत असलेले योगी आदित्यनाथ यांना हे माहीत होते की गेल्या काही वर्षांत गुंडाराज आणि दंगाराज अशी उत्तर प्रदेशची ओळख झाली आहे.
अखिलेश यादव, त्यांचे वडील मुलायम आणि मायावती यांनी गेल्या 15 वर्षात चालवलेला उत्तर प्रदेश योगींना मिळाला. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली होती: याची प्रमुख तीन कारणे होती. एक म्हणजे अपुरे पोलिस दल. राज्यातील मंजूर ३ लाख पोलिस पदांपैकी केवळ १.५ लाख पदे पूर्वीच्या सपा आणि बसपा सरकारांनी भरली होती.
दुसरे महत्वाचे कारण म्हणजे राजकारणातील बाहुबली. मुख्तार अन्सारी, अतिक अहमद, विकास दुबे, गायत्री प्रजापती हे तुरुंगांऐवजी सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये होते. आणि तिसरे कारण होते या गुंडांना सत्तेचा वरदहस्त होता. मुलायम सिंग यांचे तर निर्लज्ज समर्थन असायचे. बलात्कारासारख्या आरोपातही ते म्हणायचे लडके हैं, गल्ती हो जाती है.
योगींनी गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करायचे ठरविले. पहिल्याच बैठकीत योगींनी आपल्या गृहखात्याला यूपीच्या प्रत्येक जिल्ह्यातील गुन्हेगार, माफिया आणि गुंडांची यादी करण्यास सांगितले. जे तुरुंगातून, न्यायालयातून पळून गेले आहेत, जे न्यायालयीन खोल्यांमधून पळून गेले आहेत आणि ज्यांच्यावर वर्षानुवर्षे अनेक एफआयआर आहेत, परंतु त्यांना राजकीय संरक्षण मिळाले आहे अशांच यादी तयार करण्यात आली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी मोकळा हात दिला. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये गुन्हेगार आणि गुंडांना एकतर आत्मसमर्पण करण्याचा किंवा कायद्याच्या बडग्याल सामोरे जाण्यास तयार राहण्याचा इशारा दिला. उत्तर प्रदेशला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी या मिशनसाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती.
2017 पासून दरवर्षी या ऑपरेशन्समुळे यूपीमध्ये अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आली. 2021 च्या उत्तरार्धात, यूपी पोलिसांनी अनेक विशेष पोलिस ऑपरेशन्स केली . या कारवाईत 150 गुन्हेगारांना कंठस्नान घालण्यात आले. 3,427 गुन्हेगार जखमी झाले. 44,759 गुन्हेगार गँगस्टर कायद्यांतर्गत आणि 630 गुन्हेगार राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) होते. गुन्हेगारांविरुद्ध एवढी मोठी मोहीम उत्तर प्रदेशात अभूतपूर्व होती. यामुळे यूपीतील सर्वात भयंकर गुन्हेगारांच्याही पायाखालची जमीन हादरली.
11,981 गुन्हेगारांचे जामीन रद्द झाले आणि त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले. उदाहरणार्थ, सीतापूर जिल्ह्यात, कुख्यात आणि मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांनी स्वेच्छेने यूपीमधील पोलिस स्टेशनमध्ये हजेरी देण्यास सुरुवात केली. काहींनी तपासाला गती देण्यासाठी पोलिसांना मदत करण्याचे आश्वासनही दिले.
शामली जिल्ह्यात एका खून प्रकरणातील आरोपीने यूपी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. गुन्हेगारांना कायद्यानुसार शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी, योगी सरकारने कठोर उत्तर प्रदेश संघटित गुन्हेगारी नियंत्रण (UPCOC) विधेयक मंजूर केले, ज्याचा उद्देश राज्यातील संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी आहे.
2017 पूर्वी यूपीच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या यूपीतील अनेक दहशतवादी गुन्हेगारांचा आज वेगळा पत्ता आहे. मुख्तार अन्सारी बांदा तुरुंगात, अतीक अहमद गुजरातच्या मध्यवर्ती कारागृहात, ब्रिजेश कुमार सिंग (उर्फ अरुण कुमार सिंग) वाराणसी तुरुंगात, बबलू श्रीवास्तव बरेली तुरुंगात,
मुनीर दिल्लीच्या तिहार तुरुंगात, खान मुबारक हरदोई तुरुंगात आहे. आकाश जाट गाझियाबाद तुरुंगात, संजीव माहेश्वरी (उर्फ जीवा) लखनौ तुरुंगात, अनिल दुजाना गौतम बुद्ध नगर तुरुंगात आणि सिंहराज भाटी गोरखपूर तुरुंगात आहेत.
Law and order is one of the reason of victory, but for that, Yogi Adityanath has to deal with dangerous criminals.
महत्त्वाच्या बातम्या
- CONTROVERSIAL KCR : हिंदुस्तानातील एका राज्याच्या मुख्यमंत्री पदाला अशोभनीय वक्तव्य ! ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
- Maharashtra Budget 2022 : मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव; केसीआर – उद्धव ठाकरे भेटीचा परिणाम…??
- The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ – शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट- प्रत्येकानं बघावा असा सिनेमा- लपवलेला हिंदूंचा इतिहास-अनुपम खेर म्हणतात हा अभिनय नव्हे जिवंत इतिहास…
- Maharashtra Budget 2022 : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातले काम अर्धवट; पण बजेटमध्ये मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव!!