• Download App
    18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देण्याच्या योजनेचा प्रारंभ; कशी असेल योजना वाचा तपशीलLaunch of scheme to provide 10 lakh jobs in 18 months

    Rozgar Mela : 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देण्याच्या योजनेचा प्रारंभ; कशी असेल योजना वाचा तपशील!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी रोजगार नोकऱ्या देणे उपक्रम सुरू झाला आहे. यासाठी केंद्र सरकारने धनत्रयोदशीचा उत्तम मुहूर्त निवडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरात विविध शहरांमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यांमध्ये 75 हजार युवकांना रोजगार नोकऱ्यांची प्रमाणपत्रे वाटली जात आहेत. परंतु, हा त्यापलिकडचा तब्बल 10 लाख युवकांना रोजगार आणि नोकऱ्या देण्याचा उपक्रम आहे. Launch of scheme to provide 10 lakh jobs in 18 months

    केंद्र सरकारच्या विविध 38 खात्यांच्या रिक्त जागा भरण्याच्या या उपक्रमातून येत्या 18 महिन्यांमध्ये म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख युवकांना यातून रोजगार नोकरी उपलब्ध होणार आहेत.

    केंद्र सरकार आपल्या 38 विभागांमधील सर्व रिक्त पदे येत्या 18 महिन्यांमध्ये भरणार असून यासाठी युद्ध स्तरावर काम सुरू आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या सेवेतील अ, ब (राजपत्रित) ब (राजपत्रित) क या श्रेणीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर केंद्रीय सशस्त्र बल कार्मिक, उपनिरीक्षक, काँन्स्टेबल, कनिष्ठ लिपिक (एलडीसी), स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, रेलवे एमटीएस आदी पदांचाही समावेश आहे.

    गेल्या 7 वर्षांमध्ये तब्बल 7 लाख 22 हजार युवकांना केंद्र सरकारने रोजगार नोकरी द्या दिल्या पण एक मार्च 2020 च्या आकडेवारीनुसार 8 लाख 72 हजार पदे आजही रिक्त आहेत ही रिक्त पदे भरण्याचा केंद्र सरकारचा उपक्रम सुरू आहे. यासाठी कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच मंत्र्यांची एक सदस्य समिती गठित करून त्याद्वारे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया निश्चित केली गेली. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचा समावेश आहे.

     

    येत्या 18 महिन्यांमध्ये म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत विविध मंत्रालयांच्या गरजेनुसार ही नोकर भरती केली जाणार आहे यासाठी यूपीएससी एसएससी तसेच रेल्वे भरती बोर्ड या एजन्सीचा वापर केला जाणार आहे. यातली जास्तीत जास्त भरती प्रक्रिया ऑनलाइन केली असून ती तांत्रिकदृष्ट्या सुलभ असणार आहे. येत्या 18 महिन्यांमध्ये या भरती प्रक्रियेच्या अधिकृत जाहिराती सरकारच्या अधिकृत वेब पोर्टलवरून प्रकाशित केल्या जातील. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवून ती जास्तीत जास्त ऑनलाईन ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

    Launch of scheme to provide 10 lakh jobs in 18 months

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती

    Pahalgam terror : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान कनेक्शन!

    Terrorist attack : काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!