Abhijeet Mukherjee Joins TMC : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिजित मुखर्जी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अभिजित मुखर्जी यांनी आज कोलकात्यात तृणमूल कॉंग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला. अभिजीत मुखर्जी हे देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र आहेत. Late Pranab Mukherjee Son Abhijeet Mukherjee Joins TMC today in Kolkata
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिजित मुखर्जी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अभिजित मुखर्जी यांनी आज कोलकात्यात तृणमूल कॉंग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला. अभिजीत मुखर्जी हे देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र आहेत.
आज कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमात अभिजित मुखर्जी यांनी टीएमसीचे नेते पार्थ चटर्जी यांच्या उपस्थितीत टीएमसीचे सदस्यत्व घेतले. पार्थ चटर्जी म्हणाले की, अभिजित मुखर्जी यांनी टीएमसीमध्ये प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. हे मत त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्याजवळ व्यक्त केले होते आणि आज ते टीएमसीमध्ये दाखल झाले आहेत. आम्ही अभिजित मुखर्जी यांचे पक्षात स्वागत करतो, असे पार्थ चटर्जी म्हणाले.
भाजपमुक्त मोहिमेत मदत करतील : पार्थ
तृणमूल नेते पार्थ म्हणाले की, आम्हाला आशा आहे की अभिजीत मुखर्जी जे आपला कौटुंबिक वारसा सांभाळत आहेत, देशात भाजपमुक्त वातावरण तयार करण्यात मदत करतील. सुदीप बंदोपाध्याय हे या वेळी उपस्थित होते. त्यांनी अभिजित मुखर्जी यांचे स्वागत केले.
धन्यवाद ममतादीदी आणि अभिषेक – अभिजीत
यादरम्यान अभिजित मुखर्जी म्हणाले की, फार पूर्वी एक तरुण म्हणून पार्थ चटर्जी यांना आपल्या आईवडिलांसह भेटले होते. यावेळी अभिजीत मुखर्जी यांनी सीएम ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांचे आभार मानले. ते म्हणाले की, मी दीदी आणि अभिषेक यांच्या सूचनेवरून येथे आलो आहे.
दीदींनी बंगालमध्ये धार्मिक पक्ष रोखला : अभिजीत
अभिजीत मुखर्जी म्हणाले की, एकदा मी सरकारी नोकरी सोडून कॉंग्रेसमध्ये रुजू झालो होतो, कारण डाव्यांविरोधात वातावरण होते आणि ममता नेतृत्व करीत होत्या. भाजपवर हल्ला चढवताना अभिषेक मुखर्जी म्हणाले की, ममतांनी बंगालमध्ये एका धार्मिक पक्षाचा रथ थांबवला आहे. त्या लढा देतील आणि संपूर्ण भारत जिंकतील.
बहीण शर्मिष्ठाने लिहिले – SAD!
भाऊ अभिजीत बॅनर्जी यांनी टीएमसीमध्ये निघून जाणे दु:खदायक असल्याचे बहीण शर्मिष्ठांनी वर्णन केले आहे. अभिजीत यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर आणि टीएमसीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर शर्मिष्ठांनी ट्विट करून लिहिले आहे- SAD. अभिजीत आणि शर्मिष्ठा यांच्यात काही दिवस वडील प्रणव मुखर्जी यांच्यावरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
Late Pranab Mukherjee Son Abhijeet Mukherjee Joins TMC today in Kolkata
महत्त्वाच्या बातम्या
- Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा; सिंधिया, सोनोवाल, सुशील मोदींसहित 17 ते 22 नव्या मंत्र्यांची शक्यता
- Monsoon Session 2021 : फडणवीसांना सभागृहात बोलूच दिले नाही, भुजबळांना मात्र मुभा, यामुळे भाजप आमदार झाले आक्रमक
- Mansoon Session 2021 : विधानसभेत तुफान गदारोळ; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, वाचा सविस्तर…
- स्टॅन स्वामींचे निधन, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक
- Mansoon Session 2021 : ओबीसी आरक्षणावरून टीका करणाऱ्या भुजबळांना फडणवीसांनी दाखवला आरसा