प्रतिनिधी
कासगंज : गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांचे महाराष्ट्रात मुंबई स्मारक नेमके कुठे व्हावे?, याविषयी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी वाद सुरू केला असताना अखेरीस मंगेशकर परिवाराला शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक नको, अशी भूमिका घ्यावी लागली.Latadidi’s name for the main square in Ayodhya; CM also announces Lata Mangeshkar Music Academy in Film City, UP
या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराकडे जाणार्या मुख्य चौकाला लतादीदींचे नाव देण्यात येईल. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील नियोजित फिल्म सिटी मध्ये लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर केले.
पंतप्रधान मोदी यांनी याबद्दल मुख्यमंत्री योगी यांचे अभिनंदन केले असून लतादीदींचा सारख्या महान गोयंकार कन्येचा उत्तर प्रदेशात असा सन्मान होतो आहे, या पेक्षा देशाच्या एकात्मतेची आणखी कोणती ओळख पाहिजे!!, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. लतादीदींनी आपल्या स्वरांनी मधून राम भजन लोकप्रिय केली. अयोध्येतील श्रीराम मंदिराकडे जाताना अनेक ठिकाणी ही राम भजने म्हटली जातील. तिथल्या मुख्य चौकात आला लतादीदींचे नाव देणे यातून त्यांचे स्मरण कायम राखले जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मध्य प्रदेशमध्ये लतादीदींचे जन्मगाव इंदूरमध्ये त्यांच्या नावाने संगीत अकादमी, महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आधीच केली आहे. महाराष्ट्रात मात्र लतादीदींचे स्मारक शिवाजीपार्कवर व्हावे की नाही यावरून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे राजकीय नेते एकमेकांशी झुंजताना दिसत आहेत.
Latadidi’s name for the main square in Ayodhya; CM also announces Lata Mangeshkar Music Academy in Film City, UP
महत्त्वाच्या बातम्या
- सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : ठाकरे – पवार सरकारच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल
- SKIN TO SKIN TOUCH CASE : बाल लैंगिक शोषण कायद्याखाली एका पाठोपाठ एक वादग्रस्त निकाल देणाऱ्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांचा राजीनामा
- सीए परीक्षेत अपयश आल्याने तरुणीची आत्महत्या, गळफास घेतला
- महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा शपथविधी होतो तो दरबार हॉल बांधला होता इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्यासाठी